Google Ad
Uncategorized

गृहकर्जाचं व्याज कमी कराचंय? एका ई-मेलद्वारे होणार काम, जाणून घ्या सविस्तर माहिती…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ डिसेंबर) : गृहकर्ज EMI हा नोकरदार लोक आणि व्यावसायिक या दोघांसाठी महिन्याचा सर्वात मोठा खर्च आहे. अशा परिस्थितीत तुमचा ईएमआय (EMI) फक्त एका ई-मेलने (E-mail) कमी करता आला तर? तुम्हाला तुमच्या बँकेला एक ई-मेल लिहावा लागेल, ज्यामुळं तुमच्या गृहकर्जाचे व्याज दरमहा बदलण्यात मदत होईल. जर तुम्हाला तुमच्या गृहकर्जाचे व्याज जास्त वाटत असेल, तर तुम्ही फक्त ई-मेल पाठवून ते कमी करू शकता.

देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या वर्षी रेपो दरात सातत्याने वाढ केली. याचा परिणाम असा झाला की रेपो दर सध्या 6.5 टक्क्यांवर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या कर्जावरील व्याजातही सातत्याने वाढ होत आहे. सध्या गृहकर्जाचे व्याजदर 8.5 टक्के ते 11 टक्के दरम्यान आहेत.

Google Ad

ई-मेलद्वारे ईएमआय कमी करा

 

जर तुम्हाला तुमच्या गृहकर्जाचा EMI कमी करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या बँकेला ई-मेल लिहावा लागेल. गृहकर्जाचे फ्लोटिंग रेटमध्ये रुपांतर करावे लागेल. यासाठी तुम्हाला अगदी नाममात्र रूपांतरण शुल्क भरावे लागेल. त्यानंतर तुमच्या गृहकर्जावरील व्याजदर फ्लोटिंग रेटमध्ये रूपांतरित केले जाईल. हे रूपांतरण शुल्क तुमच्या थकीत कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के ते 0.50 टक्के असू शकते. व्याजदर फ्लोटिंग रेटवर असल्याने, RBI चा रेपो रेट बदलला की, तुमच्या EMI चा व्याजदर देखील त्यानुसार बदलेल.

RBI ने नियम बदलले 

 

अलीकडेच आर बी आय ने कर्जाशी संबंधित नियम बदलले आहेत. यापूर्वी जेव्हा रेपो रेट वाढला होता, तेव्हा बँका लोकांच्या गृहकर्जाचा कालावधी न वाढवून त्यांच्या गृहकर्जाचा ईएमआय वाढवत असत. आता यावर बंदी घालण्यात आली आहे. आता यासाठी बँकांना त्यांच्या ग्राहकांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. लोकांकडे कर्जाचे स्थिर व्याज दर किंवा फ्लोटिंग रेटमध्ये रूपांतर करण्याचा पर्याय असणार आहे.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!