Google Ad
Uncategorized

पंढरपूर : विठूरायाच्या शासकीय पूजेचा मान नगरच्या काळे दाम्पत्याला … तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे! मुख्यमंत्र्यांचं विठूरायाला साकडं

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ जून : आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला.

भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत. आज त्यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. विठ्ठलाची पूजा करण्याचा सर्वात आधी मान मिळाल्याने आम्ही धन्य झालो, असं भाऊसाहेब काळे म्हणाले. तर बा विठ्ठला… तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं.

Google Ad

आज पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब काळे हे 25 वर्षापासून वारी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दांपत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे व्यवसायाने शेती करतात. काल आठ तास दर्शन रांगेत काळे दांपत्य उभे होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!