Google Ad
Uncategorized

विशाल जाधव यांची पिंपरी चिंचवड शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल शहराध्यक्षपदी निवड बिनविरोध निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ ऑगस्ट) :ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी विशाल अनंतराव जाधव यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष (ओबीसी सेल) राज राजापुरकर,महिला प्रदेशाध्यक्ष अॅड वंदनाताई चव्हाण, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे,युवक शहराध्यक्ष इमरान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते, सचिन निंबाळकर, विशाल क्षीरसागर, विशाल शिंदे, शाहिद शेख,अशोक हरपळे पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, सुवर्णा वाळके, कविता देवकर, दिपाली पारखे, मनीषा निंबाळकर उपस्थितीत होते.

पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील ओबीसी तसेच बारा बलुतेदार यांच्याशी घट्ट नाळ असलेले नेहमी जन माणसात वावरणारे म्हणून विशाल जाधव यांची शहराला ओळख आहे,प्रत्येक सामाजिक राजकीय कार्यात हिरीरीने पुढाकार घेऊन स्वतःला समाजकार्यात झोकून देणे व ते काम तडीस नेणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे.

Google Ad

ओबीसी समाजाचे असंख्य पाठबळ असल्याने प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी विशाल जाधव यांना पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे अशा भावना ओबीसी समाज बांधवांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

विशाल जाधव यांचे ठिकठिकाणी सत्कार आयोजित केली जात असून जनसामान्यांमधून त्यांना प्रचंड असा प्रतिसाद भेटत आहे. विशाल जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले, दिलेल्या संधीचे सोने करणार तळागाळातील प्रत्येक उपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचून प्रशासनातील समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठवत राहणार, प्रत्येक क्षण समाजासाठी अर्पण करणार पिंपरी चिंचवड शहर ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते येथील कामगारांचे प्रश्न, व्यापारी वर्गाचे प्रश्न, शोषित पीडितांच्या समस्या, वाढती गुन्हेगारी, रस्त्यांच्या, ट्राफिकच्या समस्या, युवकांच्या बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा भावना व्यक्त केल्या.

अॅड वंदनाताई चव्हाण, सुप्रियाताई सुळे यांनी देखील विशाल जाधव यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात विशाल जाधव यांच्याकडून खूप सार्‍या अपेक्षा असल्याचे सांगितले तसेच विशाल जाधव या सर्व अपक्ष पूर्ण करतील आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारतील अशी आम्हाला खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच विशाल जाधव यांच्या पाठीशी भक्कपणे उभा राहील असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!