Google Ad
Uncategorized

चंद्रयानाच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ ऑगस्ट) : आज भारतासाठी सर्वात मोठा दिवस आहे. चंद्रयान 3 चंद्रापासून हाकेच्या अंतरावर असतानाच  23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकेल अशी अपेक्षा सर्व भारतीयांना होती आणि ती यशस्वी झाली  14 जुलै रोजी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित झालेलं चंद्रयान – 3 चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरण्याच्या तयारीत होते.

भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी आणि भारताच्या शास्त्रज्ञांना यश मिळो या साठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून मंदिरात पहाटे महाअभिषेक केला गेला. अभिषेकला दूध, दही, फळे, सुकेमेवे फळांचा रस वापरण्यात आला.

Google Ad

आज भारतासाठी मोठा दिवस असून भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्याच्या सुरक्षित लँडिंगसाठी गणपतीला अभिषेक करण्यात आला. या वेळी गणपतीच्या मुकुटावर चंद्रकोर लावले होते. मोहीम यशस्वी होण्यासाठी बाप्पाला प्रार्थना केली. आज संध्याकाळी ठीक 6:04 वाजता, जग त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाला, जेव्हा विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले, एखादा देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्याचा मान भारताला मिळाला. या ऐतिहासिक क्षणासह भारत चंद्रावर पोहोचणारा जगातील चौथा देश बनला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!