Google Ad
Editor Choice

आज राज्यातील 10 हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांचं ‘कामबंद आंदोलन’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जानेवारी) : आज राज्यातील 10 हजार वैद्यकीय अधिकारी ‘कामबंद आंदोलन’ करणार आहे.

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राज्यातील 10 हजारांच्या वर आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

Google Ad

आरोग्य अधिकाऱ्यांना अर्थात सीएचओ यांना शासकीय सेवेत कायम करून ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्यात यावा, वेतन निश्चिती 36 हजार रुपये आणि कामावर आधारित वेतन 40 हजार रुपये करण्यात यावं, बदल्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावं. या सर्व मागण्यांसाठी त्या अधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्यशासन दुर्लक्ष करत राहिल्यानं केल्यानं आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे. तसेच, मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!