महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात रविवार दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत प्लॉगेथॉन मोहिमेचे आयोजन केले होते. शहरातील ३२ प्रभागातील ६४ ठिकाणी ही मोहिम राबविली गेली.
मोहिमे अंतर्गत प्लॅस्टीकसह इतर कचरा गोळा केला गेला, मोहिम यशस्वितेसाठी महापालिका प्रशासनाने सर्व तयारी केली होती. शहरातील स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन, रिक्षा संघ, गणेश मंडळे, गृहनिर्माण संस्था, बचत गट, हॉटेल असोसिएशन, कलाकार, पर्यावरणप्रेमी, खेळाडू, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांच्यासह नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतल्याचे दिसून आले.
नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने प्लाॅगेथाॅन मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवून पिंपरी चिंचवड शहराला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी आपले महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल महापौर उषा उर्फ माई ढोरे सर्वांचे आभार मानले. सांगवी येथील पीडब्लूडी पाण्याच्या टाकी जवळील चौकात झालेल्या कार्यक्रमत त्या बोलत होत्या, यावेळी ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, शिक्षण समितीच्या सभापती माधवीताई राजापूरे, नगरसेविका सीमाताई चौगुले तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी नागरिक यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
लोकसहभागामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी ही चळवळ निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास महापौर ढोरे यांनी यावेळी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकासाबरोबरच आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी महापालिकेने स्वच्छतेविषयक विविध उपक्रम हाती घेतले आहेत, त्यास नागरिकांनी सहकार्य करावे.
पि.चि.मनपा प्लॅगोथाॅन 2021 स्वच्छता मोहीम निमित्त कोकणे चौक ते शिवराज नगर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहीमेत स्विकृत नगरसेवक संदिप नखाते सा.कार्यकर्ते अरूण चाबुकस्वार ड प्रभाग कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.
कोकणे चौक
नवी सांगवी शनी मारुती मंदिर
या मोहिमेत लोकप्रतिनिधींसह सेलिब्रिटी देखील सहभागी झाले होते. शिवाय महापालिकेचे पदाधिकारी, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचाही सहभाग मोठया प्रमाणावर होता. या मोहिमेमध्ये संकलित केलेल्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅस्टीक कच-यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविण्यात येणार आहे. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी आपल्या नजीकच्या ठिकाणी सहभाग नोंदवून आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले असल्याने सर्व मनपा कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतल्याचे दिसले.