Categories: Editor Choice

Shrivardhan : ‘ त्या ‘ बोटीत तीन एके 47 गन आढळल्या … पोलीस अलर्ट मोडवर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ ऑगस्ट) : श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्री मंदिराच्या जवळच समुद्रामध्ये एक बेवारस बोटआढळून आली. सकाळी आठ वाजता स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले की या ठिकाणी कोणती तरी बोट उभी आहे.

त्यानंतर त्या ठिकाणच्या पोलीस पाटलांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्याला माहिती दिली. श्रीवर्धन पोलिसांचे पथक तातडीने त्या ठिकाणी रवाना झाले. सदर बोटीची झडती घेतली असता त्यामध्ये तीन एके 47 गन आढळून आल्या. तसेच काही कागदपत्रे देखील आढळून आली असून सदरची बोट ही यूकेमधील असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच यामध्ये काही छोटे-छोटे बॉक्स आहेत. त्यामध्ये सुद्धा काही वस्तू आहेत का? याबाबतही पोलीस खात्री करत आहेत.

भरडखोल समुद्र किनारी सुद्धा अशाच प्रकारची एक छोटी बोट आढळून आली असून ती अतिशय छोटी बोट आहे. त्यामध्ये फक्त लाईफ जॅकेट आढळून आले. हरिहरेश्वर येथे सापडलेली बोट व त्यामध्ये सापडलेली हत्यारे याबद्दल श्रीवर्धन तालुक्यांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले असून अनेक अफवा देखील पसरविल्या जात आहेत. उद्या दहीहंडीचा सण असून श्रीवर्धन तालुक्यात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो.

उद्या होणारा दहीहंडी सण व आगामी येणारा गणेशोत्सव याकाळात काही घातपात घडवण्याचा अतिरेक्यांचा डाव तर नाही ना? असा संशय अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. याबाबत पोलिसां जवळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी फोन रिसिव्ह केले नाहीत. रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे श्रीवर्धन कडे येण्यासाठी निघाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

5 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

18 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

19 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago