Categories: Editor Choice

शेखर सिंह यांनी  स्विकारला …पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ ऑगस्ट २०२२) :-  नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधांची निर्मिती आणि संरचनात्मक आखणी करून शहराच्या नावलौकिकात वाढ करण्यासाठी भर दिला जाणार असून वेगाने वाढणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार आज शेखर सिंह यांनी  स्विकारला. त्यांनतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पदभार स्विकारण्याची प्रक्रिया  पार पडली. त्यानंतर  अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांनी नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांचे स्वागत केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

       २०१२ च्या आयएएस बॅचच्या महाराष्ट्र केडरचे अधिकारी असणारे शेखर सिंह एम.एस.स्ट्रक्चर इंजिनियर आहेत. २०१२ मध्ये परिविक्षाधीन कालावधीमध्ये  त्यांनी रामटेक नागपूर येथून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी म्हणून ते ऑगस्ट २०१३ पासून  नागपूर येथे कार्यरत होते. सिंधुदुर्ग  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जून २०१५ पासून काम करण्यास सुरुवात केली. जानेवारी २०१८ मध्ये ते गडचिरोलीचे  जिल्हाधिकारी म्हणून काम केले. तर जानेवारी २०२० पासून  ते सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आज त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

       प्रारंभी, आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांशी औपचारिक संवाद साधत परिचय करून घेतला. प्रामाणिकपणा, कामाप्रती एकनिष्ठता आणि कर्तव्यनिष्ठता महत्वाची असून अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागत आपली सेवा बजवावी अशी सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

1 day ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago