दिनांक १५ मार्च २०२३ रोजी रात्री एक ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्याने मंदिरास असणारे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला तसेच दानपेटीस असणारे कुलुपही तोडण्यात आल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र मित्र मंडळाचे अध्यक्ष मनीष भापकर यांनी दिली आहे. नुकतीच गणेश संकष्टी चतुर्थी झाल्याने मंदिराच्या दानपेटीत साधारण दहा हजार रुपयांच्या पुढे रक्कम असावी असा अंदाज असल्याची माहिती मिळाली.
नवी सांगवी तील एम के चौक या ठिकाणी एक मोठी बँक व दोन एटीएम केंद्र देखील आहेत, तसेच नुकतेच महानगरपालिकेच्या वतीने सी सी टिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी वारंवार चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी येथील नागरीक करत आहेत. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…