Google Ad
Uncategorized

नवी सांगवी च्या एम के चौकातील महाराष्ट्र मंडळाच्या गणेश मंदिरात चोरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मार्च) : नवी सांगवी च्या एम के चौकातील महाराष्ट्र मंडळाच्या गणेश मंदिरात अज्ञात चोरट्याने (दि.१५) रात्री एक ते पहाटे चार च्या दरम्यान चोरी केल्याची घटना घडली आहे.

दिनांक १५ मार्च २०२३ रोजी रात्री एक ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्याने मंदिरास असणारे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला तसेच दानपेटीस असणारे कुलुपही तोडण्यात आल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र मित्र मंडळाचे अध्यक्ष मनीष भापकर यांनी दिली आहे. नुकतीच गणेश संकष्टी चतुर्थी झाल्याने मंदिराच्या दानपेटीत साधारण दहा हजार रुपयांच्या पुढे रक्कम असावी असा अंदाज  असल्याची माहिती मिळाली.

Google Ad

नवी सांगवी तील एम के चौक या ठिकाणी एक मोठी बँक व दोन एटीएम केंद्र देखील आहेत, तसेच नुकतेच महानगरपालिकेच्या वतीने सी सी टिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी वारंवार चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी येथील नागरीक करत आहेत. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!