Categories: Uncategorized

नवी सांगवी पिंपळे गुरव मध्ये चौकाचौकात, रस्त्यांवर आणि पदपथांवर अतिक्रमण वाढले … रस्ते फुटपाथ कशासाठी ? नागरिकांचा मनपाला संतप्त सवाल !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ मार्च) : नवी सांगवी – पिंपळे गुरव येथे पदपथांवर अतिक्रमने वाढल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे. महापालिकेच्या वतीने तात्पुरती कारवाई केले जात असल्याने पुन्हा ही अतिक्रमणे ‘जैसे थे’ होत आहे. त्यातच रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत.

परिसरातील पदपथांवर सायंकाळच्या वेळी भाजीविक्रेते बसत आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर टेम्पो लावून भाजी विक्री करण्यात येत आहे. यात एम एस काटे चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, फेमस चौका चा समावेश आहे. तसेच दुकानदारांकडून ठिकठिकाणी पदपथांवर कायमस्वरूपी अतिक्रमणे करण्यात आली आहेत.

नवी सांगवीतील साई चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्यासमोर अनेक वाहने रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत अनेक दिवस धूळखात पडून आहेत. तसेच मुख्य चौकापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांवर अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विक्रेत्यांमध्ये अनेक वेळा वाद होताना आढळतात. महानगरपालिकेकडे अनेक नागरिक याची तक्रार करत आहेत, परंतु तात्पुरती मलमपट्टी करण्याखेरीज महानगरपालिकेकडे कायमस्वरूपी कोणत्याही प्रकारची उपाययोजना नसल्याचे वारंवार होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी वरून दिसून येते. जनसंवाद सभेतही यावर अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळे मनपाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

वारंवार तक्रार करूनही मनपाचे अधिकारी जुजबी कारवाई करतात, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव भागात तात्पुरती भाजी मंडई उभारण्यात आली असून तरीही विक्रते रस्त्यावर आणि फुटपाथवर आपला व्यवसाय करत असल्याने नागरिकांना वाहन चालवणे आणि फुटपाथ चा वापर करता येत नसल्याच्या तक्रारी जेष्ठ नागरिक आणि महिला करत आहेत. त्यामुळे महानगरपालिका अतिक्रमण विभागाने याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

सुरेश सकट (सामाजिक कार्यकर्ते)

Maharashtra14 News

Recent Posts

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २४x७ पूर नियंत्रण कक्षाची स्थापना

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ मे २०२६ –* मान्सून कालावधीत संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे…

2 weeks ago

पिंपळे निलख येथील रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; आमदार शंकर जगताप यांच्या मागणीची महापालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22 मे -- ​पिंपरी-चिंचवड: पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण…

3 weeks ago

सोसायटीवरील ‘ॲमिनेटीज्‌’ कर आकारणी रद्द करा! – चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनची मागणी – महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले निवेदन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 मे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून सोसायट्यांमधील…

4 weeks ago

तरुण-तरुणींना मिळणार ‘ऑन द स्पॉट’ हक्काची नोकरी- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 मे (प्रतिनिधी)  : पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये…

1 month ago

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा…

1 month ago