: पिंपरी-चिंचवडकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून जलदगतीने काम
सबहेड : भामा आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेमुळे पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार जादाचे प्रतिदिन १६७ दशलक्ष लिटर पाणी
महाराष्ट्र 14 न्यूज,दि.२४ सप्टेंबर २०२४:- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढते औद्योगीकरण, नागरीकरण व वाढत्या शहरीकरणामुळे लोकसंख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आधुनिक सोयी-सुविधांमुळे शहरामध्ये वास्तव्य करण्यासाठी नागरिकांचा कल वाढल्यामुळे येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाणीक्षमतेमध्ये वाढ करणे क्रमप्राप्त ठरले आहे. यासाठीच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने भामा आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेमध्ये अंतर्भाव असलेले विविध प्रकल्प जसे की, अशुद्ध जल उपसा केंद्र, १७०० मिलिमीटर व्यासाची ७.३० कि.मी असलेली रायझिंग मेन, ब्रेक प्रेशर टँकची बांधणी, १४०० मि.मी. व्यासाची १८.८० किलोमीटरची ग्रॅव्हिटी मेन जलवाहिनी, चिखली येथील नियोजित २०० द.ल.लि. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र अशा प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर असून या माध्यमातून शहरास वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मुबलक पाणी मिळणार आहे. असे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अशुद्ध जलउपसा केंद्राचे ६५ टक्के काम पूर्णत्वास
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मंजुरी दिलेल्या अशुद्ध उपसा केंद्र मौजे वाकी तर्फे वाडा येथे बांधण्याचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. अशुद्ध उपसा केंद्राच्या माध्यमातून शहरासाठी प्रतिदिन १६७ द.ल.लि. इतके पाणी उपलब्ध होणार असून उर्वरित काम प्रगतिपथावर असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
– २.८० किमी लांब १७०० मि.मी. व्यासाची रायझिंग मेन जलवाहिनी पूर्ण
मौजे वाकी तर्फे वाडा येथील अशुद्ध जल उपसा केंद्रापासून ते मौजे तळेगाव येथील ब्रेक प्रेशर टँक पर्यंत ७.३० किलोमीटरची १७०० मि.मी. व्यासाची रायझिंग मेन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यापैकी, २.८० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. याबरोबरच, उर्वरित जलवाहिनीच्या कामाची कार्यवाही सुरू असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे.
– ब्रेक प्रेशर टँक बांधणीपूर्वीचे आवश्यक काम पूर्ण
भामा आसखेड अशुद्ध जलउपसा केंद्रातून पाणी उपसा करून १७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीमधून मौजे तळेगाव येथील नियोजित ब्रेक प्रेशर टँकपर्यंत आणण्यात येणार आहे. नियोजित ब्रेक प्रेशर टँक बांधणीपूर्वीचे अत्यावश्यक काम जसे की, माती परीक्षण, जीऐ ड्रॉईंग, स्ट्रक्चरल डिझाईन ड्रॉईंग आदी कामे पूर्णत्वास आली असून नजीकच्या काळात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
– ८.४० किमीची ग्रॅव्हिटी मेन जलवाहिनी पूर्ण
तळेगाव येथील ब्रेक प्रेशर टँक पासून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यासाठी १८.८० किलोमीटर लांबीची १४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यानंतर ते पाणी चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. एकूण १८.८० किलोमीटर जलवाहिनीच्या लांबीपैकी ८.४० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्याबरोबरच, भामा आसखेड धरणातून मिळणाऱ्या १६७ द.ल.लि. पाण्यासाठी नियोजित २०० द.ल.लि. प्रतिदिनी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र चिखली येथे बांधण्याचे काम सुरू असून हायड्रॉलिक, जीऐ ड्रॉईंग, स्ट्रक्चरल डिझाईन ड्रॉईंग तपासून घेण्याचे काम सुरू आहे.
: नागरिकांना मुबलक पाणी देण्यासाठी महापालिका सदैव तत्पर!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी महापालिकेकडून विविध प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेच्या प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर असून नियोजित वेळेपर्यंत प्रकल्प पूर्ण होऊन नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. नागरिकांना मुबलक पाणी देण्यासाठी महापालिका सदैव तत्पर असून प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
: भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्णत्वास येतील!
भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेमधील अशुद्ध जलउपसा केंद्राचे काम ६५ टक्के पूर्ण झाले असून काही प्रकल्पाचे कामही जलद गतीने सुरू आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी असणाऱ्या नियोजित वेळेमध्ये योजनेतील विविध प्रकल्प पूर्ण होणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात येत आहे.
– प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
: शहरातील नागरिकांना प्रतिदिन २६७ द.ल.लि पाणी मिळण्यास पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील
आंद्रा धरण पाणीपुरवठा योजनेंतर्गत १०० द.ल.लि. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र पहिल्या टप्प्यात बांधून कार्यान्वित करण्यात आले असून भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेतील अशुद्ध उपसा केंद्रातून १६७ द.ल.लि पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांना प्रतिदिन २६७ द.ल.लि. पाणी उपलब्ध होण्यासाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील आहे.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता (१), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…