Google Ad
Uncategorized

निर्बंध शिथिलतेनंतरची पहिलीच अंगारकी , गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी …आमदार महेश लांडगे, आणि उद्योजक विजयशेठ जगताप यांनी घेतले ओझरच्या विघ्नहर्त्याचे दर्शन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३नोव्हेंबर) : गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थी आज मंगळवारी आहे. अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसतो. असाच उत्साह आज ओझरच्या विघ्नहर्ता गणपतीला पहायला मिळाला.

अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात.

Google Ad

कोरोनाच्या संकटांनंतर आलेली ही पहिली अंगारकी चतुर्थी असल्याने ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष गणेश कवडे यांनी भाविक भक्तांना विनंती करून ५१ जोडप्याला महापुजे करीता आणि अथर्वशीर्ष पठण करीता आमंत्रित केले होते, यात भोसरी चे आमदार ‘महेश लांडगे’ यांचा सपत्नीक सहभाग दिसून आला, तसेच चिंचवड मतदार संघाचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांचे बंधू उद्योजक ‘विजयशेठ जगताप’ हे ही गणपतीच्या आरतीस उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भाविक भक्तांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार महेश लांडगे बोलताना म्हणाले ‘कोरोनाच्या काळात सर्वजण अस्वस्थ झाले होते. आता कोरोनाचे संकट लवकरात लवकर जावो आणि सर्वांना आरोग्यपूर्ण जीवन लाभो, ‘भक्तांवर आलेले हे संकट पूर्णपणे नाहीसे होवो’ अशी प्रार्थना विघ्नहर्त्या गणरायास केली, तसेच ट्रस्ट करत असलेल्या कार्याचे ही कौतुक केले.

गेले दोन वर्ष कोरोनामुळे लोकांना अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेता आलेलं नाही. पण यंदा कोरोना ओसरु लागला आहे. महाराष्ट्र सरकारने मंदिरं सुरु केली आहे. कोरोना काळात कुलुपबंद असलेली मंदिरं आता उघडली आहेत आणि त्यानंतर प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीनिमित्त गणेशभक्त बाप्पाचं दर्शन मंदिरात जाऊन घेऊ शकणार आहेत. त्यामुळे शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत गणपती मंदिरात दर्शन घेताना दिसून आले. यंदा कोरोनाच्या संकटा नंतर खुप दिवसांनी मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळाली.

मंगळवारी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील भाविक ओझर तसेच अष्टविनायकाच्या दर्शनासाठी आले आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन प्रत्येक भाविकांना दर्शन दिले जात आहे. मात्र, दीड वर्षांनी अंगारकीसाठी मंदिरात जाण्याची संधी असल्याने भाविकांची संख्या वाढताना दिसत आहे. लोकांनी पर्यटनस्थळी भेट देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळेच, पर्यटकांची गर्दी पर्यनटस्थळावर किंवा देवस्थानच्या ठिकाणी दिसून येत आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!