म्युझिक अल्बम मधून स्वाती हनमघर यांचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण ! – ‘ साँग सिटी मराठी ‘ च्या पहिल्या मिलनाचा ‘ गाण्याची सगळीकडे चर्चा !

महाराष्ट्र 14 न्यूज : स्वॅश फिल्म्स आणि साँग सिटी मराठी निर्मित ‘पहिल्या मिलनाचा’ हे नवं कोरं गाणं साँग सिटी मराठी ह्या युट्युब चॅनेल वर आणि संगीत मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे रोमँटिक प्रेमगीत असून यामध्ये नव्याने प्रेमात पडलेल्या प्रेयसीची प्रियकराला भेटण्याची ओढ चित्रित करण्यात आली आहे. या चार मिनिटांच्या गाण्यात प्रेयसीच्या मनाचा ठाव घेऊन तिचे कल्पनाविलास रंगवण्यात आले आहे. तसेच गाण्यात दाखवलेल्या हिवाळ्यातील निसर्गाचे सौंदर्य आणि प्रेमाची ओढ बघून प्रेक्षकांना त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण येईल, अशी खात्री दिग्दर्शक अजित पाटील यांना वाटते.

‘साँग सिटी मराठी’ च्या ‘पहिल्या मिलनाचा’ या म्युजिक अल्बममधून स्वाती हनमघर यांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. हे ऑडियो गीत साँग सिटी मराठीचे असून व्हिडियोची निर्मिती स्वाती हनमघर आणि साँग सिटी मराठी ह्यांनी केली आहे. ‘साँग सिटी मराठी’ ह्या युट्युब चॅनेलने आजवर फक्त प्रतिष्ठित कलाकारांची गाणी न घेता नव नवीन कलारांना (संगीतकार, गीतकार, गायक, ऍकटर्स) उत्तम संधी दिली आहे. ह्या गाण्याचे ब्रोडकास्ट पार्टनर नंबर १ म्युझिक चॅनेल ‘संगीत मराठी’ वाहिनी आहे. या गाण्याचे कार्यकारी निर्माता सागरराज बोदगिरे, मेकअप आर्टिस्ट पल्लवी तावरे, कला दिग्दर्शक वैभव शिरोळकर, दिग्दर्शक अजित पाटील असून सिनेमॅटोग्राफी मयुरेश जोशी यांनी केली आहे. त्याचबरोबर संगीत मराठी वाहिनीचे सर्वेसर्वा दिपक दॆऊलकर यांच्याशिवाय हे गाणे चित्रित होणे अशक्य होते, त्यामुळे यांचे या गाण्यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे.

‘पहिल्या मिलनाचा’ हे गाणे तरुणाईबरोबरच नव्याने प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पाडणारं आहे. या अल्बमची मुख्य नायिका स्वाती हनमघर यांनी आजपर्यंत अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन मानांकन मिळवले आहे. याशिवाय त्या समुपदेशक म्हणूनही काम करतात. स्वेव युनिसेक्स स्पॅलोन स्टुडिओ अकॅडमीच्या सर्वेसर्वा स्वाती हनमघर यांनी यापूर्वी शालेय, महाविद्यालयीन नाटके यातून अभिनयाची आवड जोपासली. ‘पहिल्या मिलनाचा’ या गाण्यातून त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या पहिल्या अनुभवाबद्दल सांगताना स्वाती हनमघर म्हणाल्या, मला लहानपणापासूनच मराठी चित्रपट सृष्टीत काम करण्याची इच्छा होती. चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी मी लघुपट किंवा एखाद्या गाण्याच्या शोधात होते. परंतु मधल्या काही काळात लग्न, मुलांचे संगोपन यामध्ये अडकल्यामुळे स्वप्न मागे राहिले होते. परंतु माझे आतापर्यंतचे कार्य बघता या गाण्यातील नायिकेसाठी माझी निवड दिपक दॆऊलकर सरांना योग्य वाटली. त्यांच्या या विश्वासू संधीमुळे माझे स्वप्न सत्यात साकारता आले, याचा खूप आनंद होत आहे. या गाण्यासाठी माझी निवड केल्यामुळे मी दिपक दॆऊळकर सरांचा माझ्यावरचा विश्वास माझ्या अभिनयातून सार्थ करून दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.

पुण्यामध्ये चित्रित केलेले हे गाणे चित्रीकरणानंतर इतके मोहक दिसत आहे. हे गीत परदेशात चित्रित केल्याचा अनुभव प्रेक्षकांना गाणे बघताना येईल. ‘पहिल्या मिलनाचा’ या गाण्यामध्ये प्रेमाचे नाजूक बंध अनुभवता येणार असून हिवाळ्यातील निसर्ग सौंदर्याची गुलाबी गोडी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. गाण्याच्या चित्रीकरणासाठी दोन दिवसाचा कालावधी लागला असून या गाण्याला प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड देऊलकर तसेच चित्रपट क्षॆत्रातील अनेक कलाकरानीं भरभरून शुभेच्छा दिल्या आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

3 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

4 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago