पुनावळेतील सामाजिक कार्यकर्त्या रुपाली शेखर ओव्हाळ यांचा स्वप्निल जोशी व राज्य मंत्रि अदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव …लोकमत आयोजित कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामिगरी करणाऱ्या कर्तृत्वशालिनींचा जीवनपट उलगडणाऱ्या लोकमत वूमन ॲचिव्हर्स ‘ सत्कार तसेच कॉफी टेबल बुक चा प्रकाशन सोहळा दि.१० जानेवारी, २०२१ रोजी दुपारी ४.०० वा. हॉटेल रिट्ज-कार्ल्टन गोल्फ कोर्स स्वअर, एअर पोर्ट रोड, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी आणि इंद्रायणी थडी यांच्या सहयोगाने पार पडला.

यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. रुपालीताई शेखर ओव्हाळ यांनी आपल्या परिसरात केलेल्या समाजकार्यातुन उमटवलेल्या ठश्याची नोंद लोकमत वृत्तपत्र समूहाने घेतली आणि आज रुपालीताई ओव्हाळ यांना महाविकास आघाडीतील राज्यमंत्री अदिती तटकरे , अभिनेता स्वप्निल जोशी, इंद्रायणी थडीच्या संस्थापिका पूजा लांडगे, डी वाय पाटीलच्या भाग्यश्री पाटील, ग्रॅव्हिटिएस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या हस्ते उपस्थित कर्तृत्ववान महिलांना देण्यात येणारा “लोकमत वूमन अँचिव्हर्स ऑफ पिंपरी चिंचवड पुरस्कार” देऊन त्यांचा यथोचित असा सत्कार करून गौरविण्यात आले.

कुटुंब आणि समाजातील अनेकांचा आधारस्तंभ बनलेल्या या गुणी महिलांचा प्रवास ‘ लोकमत’ने जवळून पाहिला आहे . त्यामुळे त्यांना’ लोकमत वूमन अँचिव्हर्स ऑफ पिंपरी चिंचवड ‘ सन्मान देऊन समाजासाठी सामाजिक कार्यातून योगदान देणाऱ्या ५१ कर्तृत्ववान महिलांना गौरविण्यात आले. सामान्य ते असामान्य अशा प्रवासातील कार्यरत महिलांची दखल घेणारा , त्यांना सन्मान आणि अभिमान याची जाणीव देणारा हा सोहळा अविस्मरणीय असा सोहळा लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केला होता. पंखातील बळ , जबर महत्त्वाकांक्षा आणि अविरत कष्टाच्या जोरावर आज या महिलांनी यशोशिखर गाठले .

कुटुंबांचे व्यवस्थापन हे अत्यंत जिकिरीचे काम असताना महिला ती जबाबदारी लीलया पेलतात . खाचखळग्यांनी पुरेपूर भरलेल्या अशा या वाटेवर त्यांनी स्वत : चं स्वत : चा मार्ग तयार केला . आज या कर्तृत्ववान महिलांची गगनभरारी अमर्यादित असून इतरांना अचंबित करणारी आणि प्रेरणा देणारीही आहे . त्यांचा हा यशस्वी प्रवास , यशोगाथा निश्चितच अनेक धडपडणाऱ्या तरुणींना नकळत प्रेरणा देऊन जाईल . त्यांच्याकडे पाहून अनेकींना नवी आशा दिसते . त्यामुळेच तर त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास अवघ्या जगासमोर आणण्यासाठीचा हा एक कौतुक सोहळा होता.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago