Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत स्वच्छोत्सव मशाल यात्रा कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयअंतर्गत “स्वच्छोत्सव मशाल यात्रा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानुसार ‘ह’ आणि ‘ड’ क्षेत्रिय कार्यालयअंतर्गत पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे ‘स्वच्छोत्सव मशाल यात्रा’ कार्यक्रमाची सांगता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी सांगवी पीडब्ल्यूडी मैदान येथे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाकडून माजी महापौर उषा ढोरे, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांच्या हस्ते मशाल पेटवून साई चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, काशी विश्वेश्वर चौक या मार्गे डायनासौर गार्डन येथे पायी फेरी काढत मशाल आणण्यात आली. तसेच तुळजाभवानी मंदिर चौक येथून ‘ड’ प्रभाग कार्यालयाकडून माजी नगरसेवक, सागर अंगोळकर, महेश जगताप, माजी नगरसेविका वैशाली जवळकर, कावेरी जगताप, ड क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते मशाल पेटवून तुळजाभवानी मंदिर, बस स्थानक, गावठाण परिसर, सुर्यामुखी गणेश मंदिर यामार्गे डायनासौर चौक येथे पायी फेरी काढत मशाल आणण्यात आली.

Google Ad

यामध्ये प्रभागातील आरोग्य अधिकारी, निरीक्षक, सामाजिक विविध संस्था, आरोग्य कर्मचारी, मनपा कर्मचारी, महिला बचत गट, परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी स्वच्छ अभियान अंतर्गत नारे देण्यात येत होते. स्वच्छ भारत.. सुंदर भारत, स्वच्छ पीसीएमसी.. सुंदर पीसीएमसी, ओला कचरा.. सुका कचरा..वेगळा करा…वेगळा करा, प्लास्टिकच्या कचऱ्याला लाऊ नका काडी… घरोघरी येईल कचऱ्याची गाडी, हर घर होंगे कितने दिन..पांच दिन पांच दिन आदी नारे देत परिसर दणाणून सोडला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ”ह’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत ८ मार्च ते ३१ मार्च स्वछोत्सव राबविण्यात आला. यामध्ये या उपक्रमाची सुरुवात निळूफुले नाट्यगृह येथे ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्त स्नेह मेळावा आयोजित करून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा, कामगारांचा सन्मान करण्यात आला. या यादरम्यान विविध उपक्रम राबवून ३१ मार्च रोजी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्वच्छतेचा जागर होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी वर्ग, नगरसेविका, स्वच्छता कर्मचारी, आणि शहरातील स्वच्छाग्राही, सुजाण नागरिक आणि महिला बचत गटातील महिला स्वच्छोत्सव मशाल रॅलीमध्ये मशाल हाती घेउन सहभागी झाले होते. स्वच्छतेच्या घोषणा देण्यात आल्या आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. याबाबत जनजागृती करण्यात आली. टॉर्च लावून स्वच्छतेचा जागर करण्यात आला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!