Categories: Editor Choice

सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी लाभदायक …..सी.एफ नदाफ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ डिसेंबर) :  सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी लाभदायक आहे . शून्य ते दहा वर्षे वयोगटातील मुलींसाठी ची ही भारतीय डाक विभाग म्हणजे पोस्टाची ही योजना अतिशय लाभदायक आहे. याची माहिती सर्व पोस्ट ऑफिमध्ये दिली जाते असे मत छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे विद्यालयात भारतीय डाक विभाग पुणे व शितोळे शाळा सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने आधार नोंदणी व आधार दुरुस्ती शिबिर कार्यक्रम प्रसंगी उपविभागीय डाक निरीक्षक चिंचवड विभाग श्री. सी.एम. नदाफ बोलत होते.

पोस्टाच्या अनेक योजना चांगल्या आहे पोस्ट फक्त पत्र वाटपाचे काम करत नाही तर पोस्टाच्या पोस्टल लाइफ इन्शुरन्स, पि पी एफ आणि सुकन्या समृद्धी योजना अशा अनेक बचतीच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे ते म्हणाले. भारताचा स्वातंत्र्यदिन सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने पुण्यातून 75000 सुकन्या समृद्धी खाती काढली जाणार आहेत. शितोळे शाळेत आजपासून आधार शिबिर आयोजित केले असून त्याचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजीराव माने यांनी यासाठी पुढाकार घेतला व शाळेची एक दिवसात पन्नास खाती उघडली आहेत.

तसेच सर्व विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व आधार दुरुस्ती याठिकाणी चालणार आहे .सर्व नागरिकांना आवाहन करतो की सदर शाळेत किंवा पोस्टात जाऊन आपण या योजनांचा लाभ घ्यावा व सदर शिबिर हे तीन दिवस चालणार आहे असे ते म्हणाले या शिबिराचे आयोजन करण्यासाठी पोस्टाचे जनसंपर्क डाक निरीक्षक श्री नितीन बने व ॲडमिन डाक विभाग श्री अनिल खांडेकर यांनी या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य करत आहेत. या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्व पोस्टच्या कर्मचाऱ्यांचे स्वागत केले व निवेदन व आभार श्री दत्तात्रय जगताप यांनी केले . याप्रसंगी शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ, कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

12 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

13 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago