Google Ad
Uncategorized

नवी सांगवीतील साई चौक ते फेमस चौक दरम्यान रखडलेल्या रस्त्यास तात्पुरती तरी मलमपट्टी करावी …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० ऑक्टोबर) : नवी सांगवी तील फेमस चौक ते साई चौक या प्रभाग क्रमांक ३१ मधील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण चे काम मनपाच्या वतीने हाती घेण्यात आले होते, परंतु दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रीटीकरण चे काम करून मध्येच हे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे, त्यामुळे या भागातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने तो खराब झाल्याने या रस्त्यावर ये जा करणाऱ्यांना अनेक दिवस खड्ड्यास सामोरे जावे लागत आहे व दररोज अनेक अपघात होत असून अनेक महिला आणि जेष्ठ नागरिक घसरून पडले.

त्यामुळे या भागातील नागरिकांनी याबद्दल मनपाला तात्पुरती मलमपट्टी करण्याची मागणी केली आहे.

Google Ad

जागा मालकांनीही नागरिकांची गैरसोय होऊ नये या करीता आराखड्यानुसार रस्ता करण्यास हरकत नसल्याचे मनपास कळविले आहे व तसे निवेदनही दिले आहे. मनपाच्या वतीने सदर ठिकाणच्या रस्त्याचे काम हे मनपा आराखड्यानुसार व्हावे अशी जागा मालकाने मागणी केली असल्याचे व सदर ठिकाणी भूसंपादन झाल्यावर काम करणे शक्य होईल असे कळविले, तसेच सध्या मनपाचा कारभार हा प्रशासकाच्या हाती असल्याने व पावसाळ्यात काम करता येत नसल्याने विलंब होत आहे, आता पावसाळा संपल्याने, काम होईल व अशी आशा नागरिकांना आहे, त्यामुळे मनपा कडे मलमपट्टी शिवाय पर्याय नाही, व ती केल्यामुळे तरी नागरिकांना दिलासा मिळेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!