Google Ad
Uncategorized

ह.भ.प.श्री.संतोष महाराज पायगुडे यांना पैठण येथे श्रीसंत एकनाथ महाराज प्रबोधमार्तंड पुरस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मार्च) : तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या नाथ षष्ठी मुख्य सोहळ्याला सोमवार दिनांक १३ मार्च पासून सुरूवात झाली. तीन दिवस चालणारी ही महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाची भव्य यात्रा आहे. यावेळी दिनांक १४/३/२०२३. मंगळवार रोजी श्रीसंत एकनाथ महाराज प्रबोधमार्तंड पुरस्कार इ.स. २०२३ आणि मानपत्र  शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन, पैठण, ह.भ.प. श्री योगिराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या वतीने देण्यात आले.

ह.भ.प.श्री.संतोष महाराज पायगुडे (युवा कीर्तनकार, पुणे) हे गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायात कार्यरत आहेत व कीर्तन, प्रवचन, भागवत कथेच्या माध्यमातून समाजामध्ये भगवद्भक्ती वाढविण्याचे कार्य ते जोमाने करीत आलेले आहेत, बालपणापासूनच भजनाची व कुस्तीची आवड जोपासत त्यांनी आपले लौकिक व पारमार्थिक शिक्षण घेतले.

Google Ad

त्यांनी केलेल्या कीर्तनादिकातुन ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताच्या विषयीचे प्रेम पदोपदी जाणवते. गेल्यावर्षी श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथराजाची लेखीपारायण करत त्यांनी हजारो लोकांकरवी करून घेतली आहे. तसेच यावर्षी ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताचे चतुःशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत पायगुडे यांच्या पुढाकारातुन भागवताचेही लेखी पारायण केली जात आहेत. ती देखिल हजारोंच्या संख्येत आहेत.

आध्यात्मिक क्षेत्रात करीत असलेल्या कार्याबद्दल ह.भ.प.श्री.संतोष महाराज पायगुडे यांना पैठण येथे श्रीसंत एकनाथ महाराज प्रबोधमार्तंड पुरस्कार तसेच मानपत्र देण्यात आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!