Google Ad
Uncategorized

श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने पिंपळे गुरव येथे श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ डिसेंबर) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी, जि. नाशिक यांच्या वतीने व परमपुज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशिर्वादाने अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी, विश्वशांतीसाठी आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी ‘श्री गुरु चरित्र पारायण व अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह’ दिनांक २० डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित केला आहे.

तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने या पारायण, अखंड नाम जप-यज्ञ सप्ताह सोहळ्यात सहभागी व्हावे अशी आपणांस आग्रहाची विनंती. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व भविकांनी आपली नाव नोंदणी लवकरात लवकर सेवा केंद्रात करावी.

Google Ad

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : 9881154359, 7666307706, 9421614827

* गुरुचरित्र व यज्ञयाग स्थळ *

चंद्ररंग गोशाळा‘ इंग्रेशिया सोसायटी जवळ, पिंपळे गुरव, पुणे ४११ ०६१

या कार्यक्रमाचे सौजन्य आमदार – श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप श्री. शंकरभाऊ पांडुरंग जगताप श्री. विजयशेठ पांडुरंग जगताप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

▶️सप्ताह काळातील दैनिक यागाचे वेळापत्रक :-

मंगळवार दि. १९ डिसेंबर ग्रामदैवता सन्मान मंडल मांडणी यज्ञभूमी पूर्वतयारी

बुधवार दि. २० डिसेंबर नाम, जप, यज्ञ सप्ताह प्रारंभ, मंडल स्थापन, अग्निस्थापना स्थापित देवता हवन

गुरुवार दि. २१ डिसेंबर नित्य स्वाहाकार श्री गणेश याग, श्री मनोबोध याग

शुक्रवार दि. २२ डिसेंबर नित्य स्वाहाकार गीताई याग

शनिवार दि. २३ डिसेंबर नित्य स्वाहाकार स्वामी याग

रविवार दि. २४ डिसेंबर नित्य स्वाहाकार चंडी याग

सोमवार दि. २५ डिसेंबर नित्य स्वाहाकार रुद्र याग,

मंगळवार दि. २६ डिसेंबर नित्य स्वाहाकार, बली पूर्णाहुती दु. १२:३९ वा. श्रीदत्त जन्मोत्सव

बुधवार दि. २७ डिसेंबर श्री सत्यदत्त पूजन देवता विसर्जन अखंड नाम जप-यज्ञ सप्ताह सांगता▶️अधिक माहितीसाठी :-  http://www.dindoripranit.org

 

श्री दत्तजयंती निमित्त श्री गुरुचरिन्न पारायण व अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह ।।

दैनंदिन कार्यक्रम

* ७.३० वा. औदुंबर प्रदिक्षणा

* सकाळी ८.०० वा. भूपाळी आरती

* सकाळी ८.३० ते १० पर्यंत सामुहिक गुरुचरित्र वाचन

* सकाळी ९.३० ते १०.३० नित्य स्वाहाकार

* सकाळी १०.३० ला नैवेद्य आरती (मंत्र पुष्पाजलीसह)

* सकाळी १०.४५ ते १२.३० विशेष याग

* दुपारी १२.३० ते ३.०० भोजन व विश्रांती

* दुपारी ३.०० ते ५.३० दूर्गा सप्तशती व श्रीस्वामी चरित्र पठण

* सायंकाळी ५.३० ते ६.०० औदुंबर प्रदक्षिणा

* सायंकाळी ६.०० वा. नैवेद्य आरती (मंत्र पुष्पांजलीसह)

* सायंकाळी ६.३० ते ७.०० खालील प्रमाणे नित्यसेवा

श्री स्वामी समर्थ १ माळ सामुदायिक जपनित्य ध्यान – गीतेच्या १५ वा अध्याय गीताई, मनाचे श्लोक वाचन पसायदान, तुकारामांचा अभंग – विष्णुसहस्रनाम वाचन श्री स्वामी समर्थ १ माळ जप

७ दिवस अखंड २४ तास

विणा वादन, श्री स्वामी समर्थ जय, श्री स्वामी चरीत्र वाचनात सहभागी होता येईल.

टिप : या सप्ताह काळात आपल्या सेवा केंद्रात विशिष्ठ पद्धतीने यज्ञ, होमहवन, जप-तप, ध्यान धारणा इ. उपासना व प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. मराठी संस्कृतीतील सर्व सण-वार, व्रत-वैकल्ये सेवा यांचे प्रदर्शन ‘मराठी संस्कृती-मराठी अस्मिता’ भरवण्यात येणार आहे. तसेच जगभरातील भाविक, सेवेकरी वधु-वरांची माहिती विवाह मंडळातर्फे ‘ई-विवाह’ नोंदणी द्वारे इंटरनेटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी आवश्य लाभ घ्यावा.

नाव नोंदणी करण्यासाठी QR कोड स्कॅन करुन फॉर्म भरावा.

* प्रहर सेवा *

▶️सकाळी ०८ ते रात्रौ ०८ पर्यंत (महिलांसाठी प्रहर सेवा)

▶️रात्रौ ०८ ते सकाळी ०८ पर्यंत
(पुरुषांसाठी प्रहर सेवा)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!