Google Ad
Uncategorized

वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर … सांगवी वाहतूक शाखेच्या वतीने पिंपळे गुरव मधील मुख्य रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ डिसेंबर) : पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे, वाढलेल्या या नागरीकरणामुळे पिंपळे गुरवमधील कृष्णा चौक, काटेपुरम चौक या भागात वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. चौकात चारही दिशांनी बेशिस्तपणे वाहने चालविली जातात, व मुख्य चौकाच्या चारही बाजूस वाहने पार्क केलेली असतात त्यामुळे, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. चौकात तर वाहतूक पोलिसांसमोरच वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत.

पिंपळे गुरव येथील काटेपूरम चौक परिसर हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. या चौकातून पिंपळे गुरवकडून पुण्या कडे जाणारा मुख्य मार्ग आणि शॉर्टकट असल्यामुळे या मार्गाहून वर्दळ असते. तसेच या भागात शाळा, कॉलेजेसची संख्या देखील अधिक आहे. परिणामी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची येथे कायमच मोठी वर्दळ असते. मात्र, येथे चोहोबाजूंनी एकाच वेळी येणाऱ्या वाहनांमुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय या रस्त्याच्या लगतच अनधिकृत पथारी, भाजी विक्रेते बसत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो.

Google Ad

पिंपळे गुरव भागातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी सांगवी वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सुचनेची दखल घेत रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

पिंपळे गुरव भागातील काटे पुरम चौक , नवी सांगवीतील कृष्णा चौक या चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसवून वाहतूक बेट करावे, पिंपरी-चिंचवड व पुणे शहरला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे, काटेपुरम चौक, कृष्णा चौक व साई चौकात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेने सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत पोलिस कर्मचारी नेमावेत. बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!