Google Ad
Uncategorized

स्वच्छतेची विशेष मोहीम…निगडी ते दापाेडी मार्ग दोन्ही बाजूने स्वच्छ…

महाराष्ट्र 14 न्यूज,-दि.१९ जानेवारी २०२४:-*  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख १७ रस्त्यांवर सखाेल स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे. या अभियाना अंतर्गत आज सकाळी निगडी ते दापाेडी या मार्गाच्या दाेन्ही बाजूला सखाेल स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात तब्बल ५० टन माती, कचरा गाेळा करण्यात आला. तसेच पाण्याने रस्ते दुभाजक धुवून काढण्यात आल्याची माहिती आराेग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवड शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये असून ३२ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागात सखोल स्वच्छता मोहिम राबविण्याचे राज्य सरकारने निर्देश दिले आहेत. त्यानुसार आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार विविध भागातील रस्ते, चौकात स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली.

Google Ad

याबाबत माहिती देताना सहायक आयुक्त डांगे म्हणाले, शहरातील विविध रस्त्यांवर सखाेल स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी ७ ते १० या वेळेत निगडी ते दापाेडी या मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये तब्बल ५० टन कचरा, माती गाेळा करून कचरा डेपाेमध्ये डंपिंग केला आहे. या अभियानावेळी वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी वाहतूक विभागाचे पाेलीस उपायुक्त विवेक पाटील तसेच वाहतूक विभागाच्या कर्मचा-यांनीही सहकार्य केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!