Google Ad
Uncategorized

सामाजिक भान जपत ‘श्री गजानन महाराज मंदिर’ सर्व सेवा न्यासाकडे १५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोवीड १९ वैश्वीक महामारीमुळे उदभवलेल्या परिस्थीतीचा सामना करण्यासाठीशहरात रक्ताची नीत्तांत गरज असल्याचे महानगरपालिका वैद्यकीय विभागाकडून कळविण्यात आले , ही तातडीची सेवा आहे हे ओळखून सामाजिक जाणिव ठेऊन श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास, जुनी सांगवी पुणे २७ या ट्रस्टने या आवाहनास साथ देत आतापर्यंत तीन वेळा रक्तदान शिबिर आयोजित केले.

Google Ad

श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यासाने, तसेच महापौर, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पिंपरी व पि. चि. महानगरपालीकेचे वाय. सी. एम. हाॅस्पीटल रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३० जुलै २०२० गुरुवारी रोजी मंदिरामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते, त्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत आयोजित रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी सहभाग घेत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. आतापर्यंत १५१ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.

यावेळी सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळत, मास्कचा वापर करीत व सॅनिटायझर वापरत आरोग्यविषयक कडक काळजी घेण्यात आली. यावेळी पिंपरीचिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यासाचे अध्यक्ष श्री शरदराव ढोरे उपस्थित होते. यावेळी सर्व विश्वस्त यांचे सहकार्य लाभल्याचे अध्यक्ष शरदराव ढोरे यांनी सांगितले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!