Google Ad
Uncategorized

नागरिकांची कामे होतात, की होत नाहीत ? म्हणून जनसंवाद सभेला अल्प प्रतिसाद तर नाही ना ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मार्च) : क्षेत्रीय कार्यालयाकडील जनसंवाद सभेमध्ये नागरीकांच्या प्राप्त होणा-या तक्रारी विहित वेळेत निकाली काढण्याकरीता प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. परंतु चिंचवड विधानसभा पोट निवडणूक जाहीर झाल्याने हा जनसंवादसभा बंद होती. महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात पोटनिवडणूक जाहीर झाल्याने तसेच आचार संहिता लागू असल्या कारणामुळे जनसंवाद सभेला स्थगिती देण्यात आली होती. तब्बल दोन महिन्यानंतर कासारवाडी येथील महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील प. दीनदयाळ उपाध्याय सभागृहमध्ये सोमवारी (दि. १३) जनसंवाद सभा सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत पार पडली.

यावेळी नागरिकांची कामे होतात की होत नाहीत ? म्हणून जनसंवाद सभेला अल्प प्रतिसाद तर नाही ना ? असा प्रश्न याप्रसंगी नागरिकांमधून उपलब्ध होत होता. गेली दोन महिने जनसंवाद सभा पार पडली नाही. त्यामुळे सोमवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या तक्रारी घेऊन जनसंवाद सभेला गर्दी करून उपस्थित राहतील असा समज होता. मात्र सोमवारी ‘ह’ प्रभागात केवळ सहा नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी  मुख्य समन्वय अधिकारी अजय चारठणकर यांच्या समोर मांडल्या. यामध्ये अतिक्रमण, स्थापत्य, आरोग्य, जल नि:सारण या विभागाशी संबंधित तक्रारी होत्या.

Google Ad

प्रभागामधील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्यावतीने आठही क्षेत्रीय कार्यालयात एकाच वेळी एकाच दिवशी जनसंवाद सभा घेण्यात येते. सुरवातीला दर सोमवारी जनसंवाद सभा पार पडत असे. गेल्या काही महिन्यांपासून महिन्यातून फक्त दोन वेळाच म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभा पार पडत आहे. सुरवातीला प्रभागातील नागरिकांचा जनसंवाद सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मात्र सोमवारी झालेल्या जनसंवाद सभेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे येथील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात पहावयास मिळाले.

गेली दोन महिने जनसंवाद सभा पार न पडल्याने सोमवारी जनसंवाद सभेला नागरिक मोठ्या संख्येने तक्रारी घेऊन उपस्थित राहतील असा अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होता. मात्र फक्त सहा नागरिकांनी उपस्थिती लावून आपल्या तक्रारी मांडल्या. यावेळी नेमके अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे कारण तरी काय आहे. नागरिकांची कामे होत आहेत म्हणून की कामे होत नाहीत म्हणून या जनसंवाद सभेला नागरिक पाठ फिरवीत आहेत. असा सवाल येथील नागरिकांमधून होत आहे.

यावेळी सभेला महापालिकेचे उपायुक्त आरोग्य तथा मुख्य समन्वय अधिकारी अजय चारठणकर, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता विद्युत दिलीप धुमाळ, स्मार्ट सिटी तथा पाणीपुरवठा उपअभियंता चंद्रकांत मोरे, स्थापत्य उपअभियंता सुनील दांगडे, आरोग्य विभाग निरीक्षक धनश्री जगदाळे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्य समन्वय अधिकारी अजय चारठणकर यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर त्वरित निराकरण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.

———————————————-
सारथी द्वारे ऑनलाईन नागरिक तसेच आपले सरकार, पीजी पोर्टल, संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार आदी मार्गाने नागरिक तक्रारी दाखल करीत आहेत. त्यामुळे जनसंवाद सभेला नागरिकांच्या तक्रारी कमी असतात, त्यामुळे सभेकडे नागरिक पाठ फिरवीत आहेत असे म्हणता येणार नाही. या काळात सर्वत्र दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने कदाचित नागरिक आले नसावे. उलट संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून कामे होत आहेत, त्यामुळे ही तक्रारी कमी असतील. कामे होत नाहीत असे म्हणता येणार नाही. वेळोवेळी मी मागील तकरींचे निरसन झाले का नाही, याबाबत जनसंवाद सभेवेळी सतत अपडेट घेत असतो.
अजय चारठणकर, मुख्य समन्वय अधिकारी

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!