Google Ad
Uncategorized

महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील विविध पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करून अभिवादन..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ फेब्रुवारी २०२४ :- छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट संघटन कौशल्य असणारे न्याय आणि शिस्तप्रिय राजे होते. उत्तम व्यवस्थापन, निर्भिडपणा, जिद्द, दूरदृष्टी, युद्धशास्त्र, बंधुभाव असे अनेक गुण त्यांच्यामध्ये होते. याच गुणांच्या जोरावर त्यांनी स्वराज्यनिर्मिती करून लोककल्याणाचे ध्येय बाळगूण आदर्श राज्य निर्माण केले, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सर्वांना शिवजयंती निमित्त शुभेच्छा देताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते.

Google Ad

मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, उपआयुक्त मिनीनाथ दंडवते, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपीक देवेंद्र मोरे, वसिम कुरेशी आदी उपस्थित होते. यानंतर शहरातील विविध ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी हिंदुस्तान अँटीबायोटीक कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका निरजा व्यास, माजी उपमहापौर मोहम्मदभाई पानसरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच मारूती लोखंडे, कैलास कदम, अरूण बोऱ्हाडे, सुनिता शिवतरे, नितीन नलावडे, रमेश जाधव, सुरेंद्र पासलकर, सर्जेराव जुनवणे, तात्याबा माने, संजय खेंगरे, संतोष ढोरे, सुनिल थोरात, संजय देशमुख आणि एच.ए कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. यानंतर लांडेवाडी भोसरी, भक्ती-शक्ती चौक निगडी, डांगे चौक थेरगाव या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भक्ती शक्ती येथे झालेल्या कार्यक्रमास आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्य मिनीनाथ दंडवते, रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, डॉ. शंकर मोसलगी सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे, सामाजिक कार्यकर्ते सागर तापकीर, जीवन बोऱ्हाडे, शिवाजी साळवे तर डांगे चौक थेरगाव येथील कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे आदी उपस्थित होते.

तर अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते पिंपरी वाघेरे, रहाटणी गावठाण, थेरगाव गावठाण, प्रेमलोक पार्क चिंचवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, मुख्य लिपीक वसिम कुरेशी, तसेच विविध विभागाचे कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी कासारवाडी महानगरपालिका शाळा, दापोडी गाव, फुगेवाडी, पी. एम. टी. चौक भोसरी, मोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मोशी येथील कार्यक्रमास प्रशासन अधिकारी नाना मोरे, माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते, शरद बोराडे तर भोसरी येथील कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांच्यासह विद्यार्थी महिला व नागरिक उपस्थित होते. कासारवाडी, दापोडी आणि फुगेवाडी येथील कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, चंद्रकांता सोनकांबळे, संजय काटे तसेच कार्यकारी अभियंता सतिश वाघमारे, उपअभियंता संजय गुजर, संदिप जाधव यांच्यासह युवा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

तर मोहननगर चिंचवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, अनिल राऊत, दत्तात्रय देवतरासे, संदीप बामणे, राहुल दातीर पाटील आदी उपस्थित होते.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!