Shikrapur : बांधाच्या वादातून पुणे जिल्ह्यात वृद्धाची हत्या … दगडाने ठेचून नातेवाईकानेच प्राण घेतले

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८जुलै) : जमीन बांधाच्या वादातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर येथील ताथवडे वस्तीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 69 वर्षीय वृद्धाची त्याच्या नातेवाईकांनीच हत्या केल्याचा आरोप आहे.

शिरुर तालुक्यात केंदूर येथील ताथवडे वस्तीत जमिनी बांधाच्या वादातून 69 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आरोपी भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी याच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेले शंकरराव ताथवडे आणि भरत हे एकमेकांचे नातेवाईक होते. जमिनीच्या बांधाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हा सर्व प्रकार घडत असताना वृद्धाची पत्नी निर्मला शंकरराव ताथवडे या मध्ये आल्या. त्यावेळी आरोपी भरत याने त्यांनाही उजव्या हाताचा दंड आणि डोक्यावर मारहाण केली. शंकररावांची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. कलम 302 प्रमाणे शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

19 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago