Categories: Editor ChoiceSports

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी दिली पिंपळे गुरव मधील 2 N स्पोर्ट फिटनेस जिमला भेट … अत्याधुनिक जिम पाहून केले कौतुक!

 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८जुलै) : आजकाल प्रत्येकालाच फिट रहायचं आहे. सुंदर दिसायच आहे. पण कामाच्या व्यापातून आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाला वेळ मिळत नाही. पण त्यातूनही फिट राहण्याच्या या स्पर्धेत उतरण्यासाठी आजकाल सगळेच जिममध्ये जातात. त्यामुळे सध्या जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण त्याकरिता जिम चांगली आणि अध्यायावत असणेही फार महत्त्वाचे आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 2 N Sport Fitness ( 2 एन स्पोर्ट फिटनेस) ने पिंपळे गुरव-नवी सांगवी येथील एम एस काटे चौकातील नर्मदा लॉन्स च्या ठिकाणी तरुण वर्ग तसेच सर्व क्रीडा प्रेमीं करीता ही अनोखी संधी काटे परिवाराच्या वतीने उपलब्ध करून दिली आहे.

आज गुरुवार (दि.०८जुलै) चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आवर्जून 2 N स्पोर्ट फिटनेस जिमला भेट दिली आणि तिथे असणाऱ्या अद्यावत आणि वैशिष्ट्य पूर्ण इन्स्ट्रुमेंटची माहिती घेतली, जिम इतकी प्रशस्थ आणि अत्याधुनिक आहे, की ते तिच्या प्रेमातच पडले, आणि म्हणाले मी सुद्धा लगेचच जिम जॉईन करणार आहे. शहराच्या विकासाची जबाबदारी आणि काळजी घेण्याबरोबर आमदार जगताप यांनी व्यायामाला खूपच अनन्यसाधारण महत्व दिले आहे, ते स्वतः पहाटे लवकर उठून योगा, वॉकिंग, सायकलिंग करत असतात, त्यामुळे त्यांचे आपल्या कार्यकर्त्यांच्या शरीर आणि आरोग्याकडेही नेहमी लक्ष असते. त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून अनेक ठिकाणी तसचे सार्वजनिक उध्यानात ओपन जिमचे साहित्य देऊन नागरिकांना व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. नागरिकही या जिमचा आपले शरीर सुदृढ ठरवण्याकरीता वापर करून आनंद घेताना दिसतात.

आता लक्ष्मणभाऊ या जिमला येणार म्हटल्यावर चर्चा तर होणारच … या जिम मध्ये अत्याधुनिक मशिनरी सोबतच क्रिकेट, फुटबॉल तसेच इतर खेळाची अकॅडमी सुद्धा आहे. हे या जिमचे वैशिष्ट्य असणार आहे.

 

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

6 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

6 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago