Google Ad
Uncategorized

गेली 40 वर्षे राजकारणात सक्रिय असलेले शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत दुर्लक्ष केले याचे आश्चर्य वाटते; खा.उदयनराजे भोसले यांचा आरोप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ सप्टेंबर) : गेली 40 वर्षे राजकारणात सक्रिय असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत दुर्लक्ष केले याचे आश्चर्य वाटते, असा आरोप खा. उदयनराजे भोसले यांनी केला.

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मतही त्यांनी मांडले. उदयनराजे भोसले मंगळवारी संपत्तीच्या वाटाघाटीसाठी सोलापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Google Ad

गेल्या 40 वर्षांत मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहतो, ही दुर्दैवी बाब आहे. या काळातही शरद पवारांकडे महाराष्ट्राची सत्ता होती. त्यावेळीच आरक्षणाचा प्रश्न सुटणे गरजेचे होते. पवारांनी या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज होती, मात्र तसे त्यांनी केले नाही, अशी खंत भोसले यांनी व्यक्त केले.

मराठा समाजात सर्वच मंडळी धनवान नाहीत, तर काही लोक आर्थिक मागासलेले आहेत. त्यामुळे त्या लोकांना विकासाची संधी मिळावी यासाठी त्यांनाही आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे निवडणुकीचे कारण न करता सर्वपक्षीय आमदारांनी आणि मंत्र्यांनी एकत्रित बसून हा विषय तातडीने मार्गी लावावा, अशी भूमिका माजी खा. भोसले यांनी मांडली.

काही मंडळी आरक्षणाचा मुद्दा पध्दतशीरपणे बाजूला सारण्याचा प्रकार करीत आहेत, हे चुकीचे आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षभेद विसरुन सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!