Saswad : पुणे जिल्ह्यातील या गावात एकाच वेळी तब्बल २५ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह … विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये सध्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑफलाइन शिक्षण देण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. त्यामुळे दिनांक 23 आणि 24 डिसेंबरला सासासवड येथे सुमारे सव्वाशे शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 25 शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली आहे. हे सर्व शिक्षक ग्रामपंचायत इलेक्शन ड्युटीसाठी नियुक्त केले जाणार होते.

म्हणून या सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी केली असता त्यापैकी 25 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दुसरीकडे, जेजुरी येथेही 159 शिक्षकांची आर टी पी सी आर कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट अजून येणे बाकी आहे. यामुळे तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे असून पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने विद्यार्थी व त्यांचे पालक यांचीही कोरोना चाचणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये सामाजिक अंतर ठेवून सर्व काळजी घेत सॅनिटायझर , मास्कचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. काही ठिकाणी स्वयंप्रेरणेने शिक्षण देत आहेत. ज्याठिकाणी ऑनलाईन सुविधा नाही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये दररोज 50 टक्के शिक्षक उपस्थित राहून शालेय कामकाजा बरोबर विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देत आहेत.त्यामुळे शिक्षकांचा संपर्क विद्यार्थी व पालकांशी देखील येतो असे गृहीत धरून पुरंदरच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन केले आहे. त्यानुसार 125 शिक्षकांनी केलेल्या चाचणीमध्ये दिनांक 23 रोजी सहा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व दोन नगरपरिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर दिनांक 24 रोजी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये 17 शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 25 प्राथमिक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामधील काही शिक्षकांना कसलीही लक्षणे नसताना देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

13 hours ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

1 day ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

1 day ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

4 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

4 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

5 days ago