Categories: Editor Choice

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात … संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे

मानवता हाच श्रेष्ठ धर्म होय
सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जानेवारी) : महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमानिमित्त विशेष लेख. हा संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.

युगानुयुगे संतांचा हाच संदेश राहिला आहे, की आपण मनुष्य देहात आलो आहोत तर मनुष्य बनून जगावे. हे जे श्वास मिळाले आहे ते मर्यादित असून अनमोल आहेत. ते असेच वृथा दवडू नयेत. आपल्या हयातीतच या श्वासांचा आणि जीवनाचा सदुपयोग करायचा आहे. आपले जीवन मानवी गुणांवर आधारित ठेवून खऱ्या अर्थाने मनुष्य व्हायचे आहे. मानवतेहून श्रेष्ठ कोणताही धर्म नाही. ज्या मानवाचे जीवन मानवी मूल्यांनी युक्त आहे तो जगासाठी एक वरदान आहे. आपण आपले जीवन संतांच्या वचनांवर आधारित करावे. जेव्हा आपण सत्संसगामध्ये येतो तेव्हा आपण सत्याशी संलग्न राहतो आणि जी वचनं आपल्याला श्रवण करायला मिळतात ती जीवन जगण्याची कला शिकवतात. सत्संगामधून प्राप्त केलेल्या लहान-सहान गोष्टी जरी अंगीकारल्या आणि त्यानुसार आचरण केले तर खरोखरच या मनामध्ये परिवर्तन घडून येते आणि आपण स्वयमेव चांगल्या मार्गावर अग्रेसर होण्यास प्रेरित होतो. आपण आपल्या मनात लपलेल्या निंदा, द्वेष यांसारख्या वाईट गोष्टी असतील किंवा कोणाला हीन दृष्टीने पाहण्याची वृत्ती असेल तर या गोष्टी मनातून काढून टाकल्या पाहिजेत. एखादी व्यक्ती आपल्याला कठोर शब्द बोलली तर तिच्याशी आयुष्यभर बोलणार नाही अशा प्रकारची भावना आपल्याला आणखी संकुचित करते. याउलट आपण आपले मन विशाल करायचे आहे. जरी कोणी आपल्याबरोबर वेगळा व्यवहार केला असेल तरीही आपण त्याला चांगुलपणाच दाखवायचा आहे. जसे शेख फरीदजी यांच्या या ओळी आहेत,

की-फरीदा बुरे दा भला कर, गुस्सा मन दा ना हंडाई।
जरी कोणी वाईट करत असेल तरीही त्याचे आपण भलेच करायचे आहे. कदाचित असे करणे त्यावेळी अवघड वाटू शकते. मानवी स्वभावामुळे जर कोणी काही चुकीचे बोलले तर समोरचा मनुष्यही उलटून काहीतरी कटू वचनं बोलतो. अशा वेळी या परमात्म्याला आठवावे. कोणी जरी काही वाईट केले असेल तरीही आपण आपल्यातील जो चांगुलपणा आहे तो टिकवून ठेवायचा आहे, आपल्या शब्दांतून चांगलीच भावना व्यक्त करायची आहे.

आपले बोल, व्यवहार आणि विचार संतमतीनुसार असावेत. आपल्या मनामध्ये क्रोध किंवा असूया उत्पन्न होऊ नये. आपल्या बोलांनी कोणाचे मन दुखावले जाऊ नये ज्यामुळे तो दिवसभर तीच गोष्ट मनात ठेवून बसेल. आपण तेच कार्य करायचे आहे जे संतांनी शिकवले आहे. कोणाला दुखवू नये, कोणाच्या डोळ्यांत अश्रू आणू नये. समोरच्याचा कितीही वेगळा स्वभाव असला तरी ज्याचा जसा स्वभाव असेल तसा स्वीकारायचा आहे. आपण असेच मानायचे आहे, की ईश्वराने सृष्टीची रचना इतकी वैविध्यपूर्ण केलेली आहे, की कोणतीही वस्तू दुसऱ्या वस्तूसमान असत नाही.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago