मानवता हाच श्रेष्ठ धर्म होय
सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जानेवारी) : महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमानिमित्त विशेष लेख. हा संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.
युगानुयुगे संतांचा हाच संदेश राहिला आहे, की आपण मनुष्य देहात आलो आहोत तर मनुष्य बनून जगावे. हे जे श्वास मिळाले आहे ते मर्यादित असून अनमोल आहेत. ते असेच वृथा दवडू नयेत. आपल्या हयातीतच या श्वासांचा आणि जीवनाचा सदुपयोग करायचा आहे. आपले जीवन मानवी गुणांवर आधारित ठेवून खऱ्या अर्थाने मनुष्य व्हायचे आहे. मानवतेहून श्रेष्ठ कोणताही धर्म नाही. ज्या मानवाचे जीवन मानवी मूल्यांनी युक्त आहे तो जगासाठी एक वरदान आहे. आपण आपले जीवन संतांच्या वचनांवर आधारित करावे. जेव्हा आपण सत्संसगामध्ये येतो तेव्हा आपण सत्याशी संलग्न राहतो आणि जी वचनं आपल्याला श्रवण करायला मिळतात ती जीवन जगण्याची कला शिकवतात.
की-फरीदा बुरे दा भला कर, गुस्सा मन दा ना हंडाई।
जरी कोणी वाईट करत असेल तरीही त्याचे आपण भलेच करायचे आहे. कदाचित असे करणे त्यावेळी अवघड वाटू शकते. मानवी स्वभावामुळे जर कोणी काही चुकीचे बोलले तर समोरचा मनुष्यही उलटून काहीतरी कटू वचनं बोलतो. अशा वेळी या परमात्म्याला आठवावे. कोणी जरी काही वाईट केले असेल तरीही आपण आपल्यातील जो चांगुलपणा आहे तो टिकवून ठेवायचा आहे, आपल्या शब्दांतून चांगलीच भावना व्यक्त करायची आहे.
आपले बोल, व्यवहार आणि विचार संतमतीनुसार असावेत. आपल्या मनामध्ये क्रोध किंवा असूया उत्पन्न होऊ नये. आपल्या बोलांनी कोणाचे मन दुखावले जाऊ नये ज्यामुळे तो दिवसभर तीच गोष्ट मनात ठेवून बसेल. आपण तेच कार्य करायचे आहे जे संतांनी शिकवले आहे. कोणाला दुखवू नये, कोणाच्या डोळ्यांत अश्रू आणू नये. समोरच्याचा कितीही वेगळा स्वभाव असला तरी ज्याचा जसा स्वभाव असेल तसा स्वीकारायचा आहे. आपण असेच मानायचे आहे, की ईश्वराने सृष्टीची रचना इतकी वैविध्यपूर्ण केलेली आहे, की कोणतीही वस्तू दुसऱ्या वस्तूसमान असत नाही.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…