Google Ad
Uncategorized

डोनेट एड सोसायटीने आयोजित केलेल्या …. ‘इंद्रायणीकाठी’ या सुमधुर अभांगातून सांगवीकरांनी अनुभवला माऊलींचा समाधी सोहळा …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ नोव्हेंबर) : ज्ञानोबा, माऊली तुकाराम’ हा जयघोष ऐकण्यासाठी व्याकुळ झालेली इंद्रायणी तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा गजबजली आहे. आळंदी मध्ये माऊलींच्या ७२५ व्या संजीवनी समाधी सोहळ्याला आज पासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर कार्तिक स्नान व काकडआरतीच्या पर्वकाळाचे औचित्य साधून भावस्पर्शी अभंग आणि भजनातून माऊलींचा समाधी सोहळा आज (दि.२८) रोजी सांगवीमध्ये ‘इंद्रायणीकाठी’ या कार्यक्रमातून सांगवीकरांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला … कार्यक्रमासाठी भक्तांच्या झालेल्या गर्दीने परिसर फुलला होता, त्यामुळे परिसरातील वातावरण अगदी भक्तिमय झाल्याचे यावेळी दिसून येत होते.

डोनेट एड सोसायटी’ च्या वतीने आयोजित ज्ञानोबारायांच्या हृदयस्पर्शी अभंगाचा भावस्पर्शी कार्यक्रम सोहळा ‘इंद्रायणीकाठी‘ हा रंगला होता…. सुमधूर भजनसंध्या कार्यक्रमातून संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलींचे वैभव हे अद्वितीय आहे, हे … मुळशीरत्न ZEE टॉकीज फेम श्री . सोमनाथजी साठे ( पुणेकर ) ( संगित अलंकार , मुळशी ) यांनी सादर केलेल्या अभंगवाणीतुन दिसून आले. त्यांना सागरजी भदे ( संगीतविशारद , मुळशी ), निलेशजी कसबे ( हंसध्वनी संगित विद्यालय , रहाटणी ) यांनी साथ दिली. तर ज्ञानप्रभा क्लासेसचे प्रभाकर कराळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Google Ad

सांगवीतील गजानन महाराज मंदीर समोरील मैदानात महापौर माई ढोरे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने सोहळ्यास सुरुवात करण्यात आली, यावेळी नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेवक हर्षल ढोरे, मा. नगरसेवक प्रशांत शितोळे, हभप ब्रभृहन महाराज वाघ, शितोळे महाराज तसेच भक्तमंडळी उपस्थित होते. सौ . सारिका कृष्णा भंडलकर ( गमरे ) अध्यक्ष डोनेट एड सोसायटी , आणि कृष्णा भंडलकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!