Categories: Editor Choice

कासारवाडीतील दत्त मंदिरात दत्त जन्मानिमित्ताने रंगला भक्तांचा मेळा … बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात, समाधान महाराज शर्मा यांच्या किर्तनाने आणले पाणी…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ डिसेंबर) : पिंपरी चिंचवडशहरातील कासारवाडी येथील श्रीदत्तसाई सेवा कुंज आश्रम मंदिरात, दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पहाटे काकडारतीपासून सुरुवात होत गुरू चरित्र ग्रंथांचे पारायण, महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन अशा धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने कासारवाडी- पिंपळे गुरव परिसरातील वातावरण धार्मिक आणि प्रसन्नतेने भारावले आहे.

आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार’ आणि श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रम द्वारा आयोजित हरिनाम कीर्तन सप्ताह दि.०१ डिसेंबर ते ०८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हरिकीर्तन सप्ताहाच्या सातव्या दिवशी हभप रामायणाचार्य ‘समाधान महाराज शर्मा’ यांचे स्वामी विवेकानंद यांच्या रुपाने कीर्तनातून त्यांनी भाविकांना प्रबोधित केले. भाविकही त्याचा आनंदाने आस्वाद घेत होते.

यावेळी कीर्तनात ‘समाधान महाराज शर्मा’ म्हणाले, ही सर्व व्यवस्था पाहून मी भारावुन गेलो आहे. मंडप कसा असावा, टाळकरी कसे असावेत, औदुंबराच्या झाडाखाली दत्त गुरूंची मूर्ती कशी असावी, भंडारा डोंगरावर होणारे तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर कसे दिसेल, एका रात्रीत गोशाळा एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन सप्ताहाचे आयोजन कसे करावे, हे पाहण्यासाठी खरचं महाराष्ट्रातील किर्तनकारांनी येथे यावे असे ही व्यवस्था आहे, असे शर्मा महाराज म्हणाले…

आज कासारवाडीतील दत्त मंदिरात दत्त जन्माच्या सोहळ्याचे किर्तनाने तसेच दत्त गुरूंच्या भजनाने मान्यवरांच्या उपस्थित हा भावभक्तीचा सोहळा पार पडला.

 

▶️कीर्तन सोहळा :-

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago