महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जानेवारी) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी फाटा ते रक्षक चौक दरम्यान डिसेंबर महिन्यात हायटेन्शन टॉवर वर असणारी विजेची तार हटवण्यात आली व रस्त्याच्या कडेला उंच पोल उभारण्यात आले व त्यावर ती टाकून अडथळा दूर केला, परंतु जुना सांगाडा मात्र तसाच उभा असून अजून प्रशासन का हटवत नाही हा प्रश्न आहे?
आज (दि.१५) दुपारी औंध रावेत बी आर टी रस्त्यावर भरधाव आरएमसी ट्रक रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकावर चढला आणि समोर असणाऱ्या हायटेन्शन टॉवर ला धडक होता होता वाचली. परंतु वीज वाहक तार काढली नसती आणि अपघात होऊन संबंधित टॉवर ला धडक झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
भविष्यात अशी घटना घडू नये याकरिता महानगरपालिका प्रशासनाने संबंधित टॉवर हटवून अडथळा दूर करावा तसेच या रस्त्यावर दुतर्फा सायकल ट्रॅक आणि फूटपाथ तयार करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी तो वापरण्या योग्य राहण्या करीता रस्त्याच्या कडेला टेम्पो मधून फळ विक्री करणारे विक्रेते हटवून यापुढेही भविष्यात होणारे अपघात टाळावेत या करिता प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.
या अगोदर २०१८ ला महामंडळ बस व्हॉलो मुंबई बस या ताराना स्पर्श होऊन ac जळाला होता तेव्हापासून हे तार हटवण्याची मागणी होत होती.