Categories: Editor ChoicePune

Pune : ऑक्सिजन सिलेंडरचा आवाज होत असल्याने हॉस्पिटलवर रहिवाशांची दगडफेक , पुण्यातील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र 14 न्यूज : ऑक्सिजन सिलेंडरचा आवाज होत असल्याच्या कारणावरून कोरोनाचे रुग्ण असलेल्या हॉस्पिटलवर लगतच्या रहिवाशांनी दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खराडी येथील रायझिंग केअर हॉस्पिटलसोबत हा प्रकार घडला. चंदननगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या खराडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या खराडी परिसरात हे हॉस्पिटल आहे. जून महिन्यापासून याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे १६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे या रुग्णालयात ऑक्सिजनची प्रचंड मागणी असते. त्यामुळे दररोज दोन ते तीन वेळेस ऑक्सिजन सिलेंडर घेऊन गाडी येत असते. गाडीतून सिलेंडर बाहेर काढताना, रिकामे सिलेंडर आत टाकताना आवाज होतो. यावर रुग्णालयालगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेत अनेकदा हॉस्पिटल प्रशासनासोबत वाद घातला होता. परंतु सोमवारी येथील स्थानिक नागरिकांनी टोकाची भूमिका घेत हॉस्पिटलवर दगडफेक केली. या प्रकारानंतर रुग्णालयाचे व्यवस्थापक उमेश शिवाजी गिरी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या मजल्यावरून ड्रायव्हरच्या डोक्यावर कुंडी फेकण्याचा प्रयत्न, हॉस्पिटललगत असणाऱ्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ऑक्सिजन सिलेंडर घेऊन येणाऱ्या टेम्पो चालकाच्या डोक्यावर भरलेली कुंडी फेकण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु सुदैवाने ही कुंडी गाडीवर पडल्यामुळे अनर्थ टळला. अन्यथा ड्रायव्हरचा कपाळमोक्ष झाला असता. या घटनेनंतर दोन तास सिलिंडर बदली झाले नव्हते. त्यामुळे रुग्णांचा जीवही धोक्यात आला होता. याआधीही स्थानिक नागरिकांनी याच कारणावरून रुग्णालयाचे गेट बंद करीत सुरक्षा रक्षकाला शिविगाळ केली होती.

वैद्यकीय कर्मचारी एकीकडे कोरोना संकटाशी दोन हात करत असताना त्यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून होणारा हा प्रकार दुर्दैवी आहे. इतक्या गंभीर प्रकरणानंतरही पोलिसांनी केवळ अदखलपात्र पात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago