महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील राहटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संचालित, न्यू सिटि प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये २६ जानेवारी हा ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कॅप्टन संतोष कोकने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व लेझीमचे आयोजन करण्यात आले होते तसेच परेड करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कॅप्टन संतोष कोकणे म्हणाले, आपला देश हा ७१वर्षापूर्वी साधी टाचणी बनवण्यास पात्र न्हवता, परंतु आज देश चंद्रमोहीम ,मंगळमोहीम द्वारे आकाशाला गवसणी घालत आहे, ही अभिमानाची बाब आहे, तसेच पुण्यातील हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूट येथे कोरोना प्रतिबंधक लस आपल्या देशानेच सर्वात प्रथम बनवली असल्यामुळे आपल्या देशाचा जगात नावलौकिक झाला आहे. १९५० ला लावलेले इवलेसे लोकशाहीचे रोपटे आज जगात सर्वात मोठे संसदीय लोकशाहीवादी महावृक्ष ठरत आहे” याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे.
आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली काळे व उत्कर्षा पाटील यांनी केले. तर सचिन कळसाईत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…