Google Ad
Uncategorized

नागरिकांना दिलासा … श्रीमंत महापालिकेची नव्या आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ नाही …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ मार्च) : आशिया खंडात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेने नव्या आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ केलेली नाही. शिवाय, मिळकतींचे करयोग्यमूल्यही गेल्या वर्षीप्रमाणेच कायम ठेवले आहे. २०१५-१६ तेच राहिले असून त्याबाबतचे कर व करेत्तर दरपत्रक महापालिकेने जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Google Ad

एक वर्षाच्या पूर्वीच नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि प्रशासकीय यंत्रणा कारभार पाहू लागली. आणि असे असून कोरोनाचा तीन वर्षांचा कालावधी संपून सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. शिवाय, सरकारने घेतलेल्या शास्ती माफी निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मिळकतकराची मूळ रक्कम भरणाऱ्यांना शास्ती माफीचा लाभ शुक्रवारी रात्रीपर्यंत घेता येणार आहे. शास्ती माफीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटणार असल्याने मिळकतकरात वाढ होण्याची व करयोग्य मूल्य नव्याने ठरविले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, महापालिकेने गेल्या वर्षीप्रमाणेच सर्व कर आकारणी ठेवून नागरिकांना दिलासा दिला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!