Google Ad
Uncategorized

कांदा उत्पादकांना दिलासा, देवाभाऊंचा थेट जपानमधून खुलासा … देवा भाऊ ‘सुपरफास्ट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ ऑगस्ट) : कांदा प्रश्नावर यशस्वी तोडगा काढल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या प्रश्नावर यशस्वी तोडगा काढण्यात केंद्र सरकारला यश आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी फोनवरून केलेल्या चर्चेनंतर 2410 रुपये प्रति टन दराने कांदा खरेदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आता जपानमधुन आभार मानले आहेत.

Google Ad

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानतो. कांद्याच्याबाबत जो प्रश्न निर्माण झाला, आणि कांद्यावर निर्यात शुल्क लावल्यामुळे महाराष्ट्रासारख्या कांदा उत्पादक राज्यात एक जो संभ्रम तयार झाला होता. तो दुर करण्याचं काम हे केंद्र सरकारने केलं. तात्काळ निर्णय घेऊन कांदा हा केंद्र सरकार एजन्सिसच्यामार्फत खरेदी करणार आहे. आणि 2410 रुपये प्रति टन त्याचा भाव देखील निश्चित करण्यात आलेला आहे. यामुळे मला विश्वास आहे की, निश्चित शेतकऱ्यांना दिलासा मिळेत.” असं फडणवीस म्हणले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!