Categories: Editor Choice

कोणाला मिळणार बूस्टर डोस … हेल्थ केअर वर्कर , फ्रटंलाईन वर्कर आणि ६० वर्षेवरील नागरीकांच्या कोविड १९ प्रिकॉशन डोसबाबत …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१०जानेवारी) : महाराष्ट्र शासन आदेशानुसार दि . १० जानेवारी , २०२२ पासून हेल्थ केअर वर्कर , फ्रटलाईन वर्कर , ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्ती यांनी कोविड १९ लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांना कोविड १९ लसीचा प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे .

प्रिकॉशन डोसकरीता संबंधित लाभार्थीचे कोविड १९ लसीचा दुसरा डोसच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे . तसेच ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रिकॉशन डोस घ्यावा .

सहव्याधी असलेल्या व्यक्तिना प्रिकॉशन डोस करीता लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किंवा दाखविण्याची आवश्यकता नाही . प्रिकॉशन डोस घेणेकरीता लाभार्थ्यांसाठी कोविन ऍपमध्ये खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. – • हेल्थ केअर वर्कर , फ्रंन्ट लाईन वर्कर व ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरीक यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाऊंटवरुन प्रिकॉशन डोससाठी नोंदणी करता येईल .

दुसऱ्या डोसनंतर ९ महिने किंवा ३ ९ आठवडे पूर्ण झालेले लाभार्थीच प्रिकॉशन डोससाठी पात्र ठरतील . • सर्व हेल्थ केअर वर्कर , फ्रेन्ट लाईन वर्कर , ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा कमी आहे आणि त्यांची नोंदणी कोविन ऍप मध्ये नागरिक म्हणून झालेली आहे अशा लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोससाठी पात्र होण्यासाठी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल .

तसेच अशा व्यक्तिंचे लसीकरण फक्त शासकीय लसीकरण केंद्रात ऑनसाईट पध्दतीने उपलब्ध असेल . • कोविन सिस्टममधून अशा व्यक्तिंना प्रिकॉशन डोस घेण्यासाठी संदेश ( SMS ) प्राप्त होणार आहे . नोंदणी व लसीकरणाची वेळ ही ऑनलाईन किंवा जागेवरच ( Walk in ) or on the spot registration स्वरुपात घेता येईल . प्रिकॉशन डोस घेतल्यानंतर कोविन सिस्टममधून प्रमाणपत्र मिळवता येईल . तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की , हेल्थ केअर वर्कर , फ्रंन्ट लाईन वर्कर व वय वर्षे ६० व त्यावरील लाभार्थीची कोविड १ ९ लसीचा दुसरा डोसच्या तारखेपासून ९ महिने अथवा ३ ९ आठवडे पुर्ण झालेली आहेत त्यांनी महापालिकेमार्फत चालू असलेल्या १८ वर्षा वरील कोविड १९ लसीकरण केंद्रावर जावून प्रिकॉशन डोस घ्यावा .

तसेच या कामीच्या लसीकरण केंद्राची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल . असे डॉ. लक्ष्मण गोफणे ) सहा . आरोग्य वैदयकिय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी कळविले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

18 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago