दिलासादायक : रुग्णसंख्या घटल्याने पिंपरी चिंचवडकरांना मिळू शकतो कोरोनातुन दिलासा …

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. २४ मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार ( दि.२४ मे २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ४२३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ६२६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर ३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला यातील २४ रुग्ण हे पिंपरी चिंचवड शहरातील तर १५ रुग्ण हे पिं. चिं. मनपा हद्दीबाहेरील आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील रुग्ण संख्या गेल्या आठ दिवसात झपाट्याने कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अडीच हजारावरून आज पाचशेच्या आत आले आहे. हेच प्रमाण मार्च एप्रिल महिन्यात दररोज वाढताना दिसत होते, त्याला कुठे तरी ब्रेक दि चेन चा ब्रेक लागल्याचे आज तरी दिसत आहे. त्यामुळे आज निम्म्याहून अधिक बेड हे रिकामे दिसत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ कमी झाल्याचे दिसत आहे, हे चित्र असेच राहिले तर लवकरच यातून सुटका होईल असे वाटते, पण हे सगळे आपल्या हातात आहे, याची शहरातील सुजाण नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे एवढचं …

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

18 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago