Google Ad
Uncategorized

Ratnagiri : सेल्फी घेताना बायको पाण्यात पडली … वाचवण्यासाठी नवऱ्याने घेतली उडी, अन …

महाराष्ट्र 14 न्यूज : सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन समुद्रात पडलेल्या बायकोला वाचवायला गेलेल्या नवऱ्याचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. गुहागरमधील हेदवी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. अनंत माणगावकर 36(पती) आणि सुचेना माणगावकर33(पत्नी) अशी मृतांची नावं आहेत.

हेदवी येथील ‘बामणघळ’ या ठिकाणी दोन्ही बाजूला उंच कडा आणि मध्येच समुद्राच्या येणाऱ्या लाटांचा अनोखा देखावा पाहण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी गर्दी करतात. उंच उसळणाऱ्या फेसाळ लाटांचा कड्यावर उभं राहून सेल्फी घेण्याचा मोह इथं आलेल्या प्रत्येकाला आवरता येत नाही. मात्र अनेकजण अतिरेक करण्याच्या नादात खाली कोसल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

Google Ad

आज सकाळी ठाण्याहून आलेले एक कुटुंब हेदवीच्या किनाऱ्यावर फिरायला गेले होते. त्यावेळी पत्नी सेल्फी घेत असताना तिचा तोल जाऊन ती खडकात पडली आणि थेट पाण्यात वाहून गेली. पडलेल्या पत्नीला बाहेर काढण्यासाठी पतीनेही पाण्यात उडी घेतली,मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहापुढे पतीचे काहीच चालले नाही आणि त्यामुळे तोही पाण्यात वाहून गेला. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे.

हे दोघेही ठाणे येथून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. स्थानिकांनी दोघांनाही पाण्याच्या बाहेर काढले असून गुहागर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, लॉकडाऊननंतर अनलॉक प्रक्रियेनुसार पर्यटकांना पर्यस्थळी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र आनंद लुटण्याच्या नादामध्ये काही पर्यटकांकडून उत्साहाच्या भरात चुकीची कृती होते आणि हकनाक जीव जातो. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!