महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यातील कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून पुणे महानगरपालिकेने या पार्श्वभूमीवर पुण्यात केरळमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. महापालिका कार्यालयातून या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
पुणे शहरात केरळ राज्यातून येणार्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल सादर करावा लागणार आहे. ज्या प्रवाशांची ही चाचणी निगेटीव्ह आहे त्यांना त्यांच्या इच्छित स्थानी जाण्याची परवानगी असेल, तर इतरांना प्रक्रियेनुसार अलगीकरणात अथवा विलगीकरणात ठेवणे आवश्यक असेल.
खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने राज्यात प्रवेश करतांना केरळमधील प्रवाशांना कोरोना निगेटीव्ह अहवाल सादर करणे अनिवार्य केले आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी आगमनाअगोदर ७२ तासांच्या आत करणे अनिवार्य असेल. १८ फेब्रुवारीपासून शहराच्या हद्दीत प्रवासांवरील निर्बंध महापालिकेने वाढविले आहेत. या निर्बंधाशी संबंधित आदेश गुरुवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…