Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत आणखी एक गोळीबाराची घटना … अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या! 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ डिसेंबर) : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसून येत नाही. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

Google Ad

जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर मध्यरात्री १२: ३० वाजेच्या सुमारास नॅशनल हॅवी कंपनीसमोर १७ वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतक मुलाचे नाव दशांत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तळेगाव पोलीस करत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक मुलगा हा बुधवारी सायंकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही अखेर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या मुलाचा मृतदेह नॅशनल हॅवी कंपनीसमोर आढळून आला आहे. त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचेही दिसून आले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!