Categories: Editor Choice

कुदळवाडी औद्योगिक वसाहतीत नवीन वीजखांब-दिवे बसवा … स्वीकृत नगरसदस्य ‘दिनेश यादव’ यांची आग्रही मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जून) : कुदळवाडीत नवीन विजेचे खांब व खांबावरील नादुरुस्त दिवे हटवून नवीन दिवे बसविण्याची मागणी होत आहे. याबाबीची दखल घेत, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी ‘फ’ प्रभागाचे कनिष्ठ विद्युत अंभियंता दिलीप भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे  मागणी केली.

कुदळवाडी हा औद्योगिक वसाहतींचा परिसर आहे. मोठ्या सुविधा अपेक्षित असताना महापालिकेचे नेहमीच या भागाकडे दुर्लक्ष होते. परिसरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. स्थानिक पातळीवरील छोट्या-मोठ्या वीजेच्या समस्याही पालिकेकडून सुटत नाहीत. या भागात विद्युत खांबांवर एलईडी लाईट लावण्यात आलेले आहेत. परंतु, त्यातील काही एलईडी लाइट बंद आहेत. वाढत्या विस्तारीकरणामुळे विजेच्या खांबाची संख्याही वाढविणे गरजेचे आहे. मात्र, पालिका प्रशासन या बाबीकडे कानाडोळा करीत आहे, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

▶️अधिकाऱ्यांनी दिले कार्यवाहीचे आश्वासन…
तत्कालीन आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यावेळी आयुक्तांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. याचे स्मरणदेखील केले. त्यावर दिलीप भोसले यांनी कुदळवाडी परिसरात नवीन स्ट्रीट लाईट पोल व दिवे बसविण्याकामी खर्चाची आवश्यक ती तरतूद करून समस्या निकालात काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago