पिं. चिं. मनपा कर्मचाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालय व मुख्य प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी प्रशासनाचा काळ्या फिती लावून केला निषेध!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने वरदायिनी असलेली धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करून त्याऐवजी खाजगी विमा पॉलिसी लागू करण्याचा एकतर्फी निर्णय कर्मचारी महासंघाला विश्वासात न घेता प्रशासनाने घेतला आहे. त्यास कर्मचारी महासंघाचा विरोध कायम असल्याचे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर किसनराव चिंचवडे यांनी जाहीर केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य कार्यालय, सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच पि एम पी एम एल च्या निगडी डेपो, भोसरी डेपो व पिंपरी डेपो यांच्या प्रवेशद्वारात कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व प्रभाग कमिटी यांच्यातर्फे महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना तिळगुळ वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या त्याच सोबत या सणासुदीच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून धन्वंतरी बंद करू पाहणाऱ्या प्रशासनाचा निषेध करावा असे आवाहन केले.
त्यास सर्व अधिकारी कर्मचारी वर्गातून भरघोस प्रतिसाद मिळाला व महापालिका सर्व क्षेत्रीय कार्यालय व मुख्य प्रशासकीय इमारत या ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध म्हणून काळया फिती लावून काम केले.यामध्ये कर्मचारी महासंघाच्या सर्व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago