Google Ad
Uncategorized

नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित , दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६४ वा महाराष्ट्रदिन व आंतरराष्ट्रीय दिन कामगार साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक- १ मे २०२३) : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित , दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६४ वा महाराष्ट्रदिन व आंतरराष्ट्रीय दिन कामगार साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सदस्य मा.स्वाती पवार मॅडम व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या स्कूल व कॉलेजच्या प्राचार्या इनायत मुजावर मॅडम अध्यक्षस्थानी होत्या. मा.मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

प्रथमतः कामगार दिना निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देऊन ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांना नमन करून ध्वजारोहण झाले.नंतर राष्ट्रगीतातून आदर व्यक्त करण्यात आला .आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.१ मे आणि कामगार दिवस तसेच मराठीचे महत्त्व ऋषिकेश सरांनी आपल्या मनोगतातून सुंदर अशा शब्दातून व्यक्त केले.आपले महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यानंतर ज्या व्यक्तींनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा हुताम्याना वंदन करून ध्वजारोहण प्रमुख पाहुणे मा.पिंजन सर व मा.जयश्री माळी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता दहावीचा अथर्व धुपरगुडे याने महाराष्ट्राची माहिती आपल्या मनोगतातून स्पष्ट केली.नंतर मा. प्राचार्य इनायत मुजावरमॅडम यांनी कामगार दिनाचे महत्त्व स्पष्ट करून यावर्षीची कामगार चळवळीची थीम बाल कामगार वर्गाचे शोषण थांबवणे याबाबत सुंदर शब्दात सांगितले.

Google Ad

तर माननीय स्वाती पवारमॅडम यांनी जर प्रगतीकडे वाटचाल करायची असेल तर कष्टाला महत्व द्यावे हे अत्यंत सुंदर शब्दात व्यक्त करून स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी आहेत हे स्पष्ट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा. शंकर शेठ जगताप, मा. विजू अण्णा जगताप, सदस्य मा. स्वाती पवार मॅडम, मा. देवराम पिंजण सर, तसेच मा.प्राचार्या मुजावर मॅडम,सर्व शिक्षकवृंद, ऑफिस कर्मचारी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता खराडे व स्मिता पिंपळे यांनी केले. अशाप्रकारे एका नव्या उमेदीने नव्या प्रेरणेने पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!