Categories: Editor Choice

पिंपरी – चिंचवडचे बहुचर्चित पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ एप्रिल) : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली आहे.

व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाकडून एक परिपत्रक काढण्यात आलं असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कृष्णप्रकाश यांच्यासोबत नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे याचीही राज्याचे महिला अत्याचार प्रतिबंधक विभागामध्ये महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

राज्यातील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली व्हीआयपी सुरक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली असून त्या ठिकाणी आता अंकुश शिंदे पदभार घेणार आहेत. अंकुश शिंदे हे यापूर्वी सुधार सेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर होते.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली होती. दिवसाढवळ्या बंदुक आणि तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडांचा सुळसुळाट झाला होता. त्या विरोधात कृष्णप्रकाश यांनी कडक भूमिका घेतली होती, तरीही या घटनांवर पोलिसांना नियंत्रण ठेवण्यास अपयश आल्याची चर्चा होती. त्यामुळे आता कृष्ण प्रकाश यांची बदली झाल्याची चर्चा सुरू आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

10 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago