Categories: Editor Choice

‘दुवा आणि दवा’ ने आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या प्रकृतीत सुधारणा … व्हेंटिलेटर काढले, कार्यकर्त्यांचे चेहरे खुलले !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० एप्रिल) : काही नेते व कार्यकर्ते यांचे नाते अतिशय जीवाभावाचे असते याचा प्रत्यय नुकताच पिंपरी चिंचवड शहरात आला. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली. त्यांना गेले आठ दिवस झाले रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

दुवा आणि दवा दोन्हीची प्रचिती :

मात्र नेत्याची प्रकृती अस्वस्थ असताना इकडे त्यांच्या कार्यकर्त्याच्या मनातही घालमेल होऊ लागली. तसं तर पिंपरी चिंचवड मधील अनेक कार्यकर्त्यांनी लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रकृतीत (Good Health) लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी देवाला साकडं घातलं आणि आज त्याचा प्रत्येय आला, डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढल्याचे तसेच ते स्वतः प्रतिसाद देत असल्याचे सांगितले, त्यामुळे दुवा आणि दवा दोन्हीची प्रचिती आल्याचे समाधान कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. रुग्णालयातील डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. तर गेले आठ दिवस झाले सर्व कार्यकर्ते रुग्णालयात ठाण मांडून आहेत, तर काही त्यांच्या दीर्घायुष्यकरीता प्रार्थना करत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात काय कमवलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही, हे या गर्दीच्या जनसागरातून दिसून येते!

राजकारणा पलीकडचे भाऊ :

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यातुन आलेल्या गोरगरिबांची अनेक वर्षे सेवा केली, कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत अशा संकटाच्या काळात गोरगरिबांना स्वतंत्र आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली, तर भुकेलेल्याना अन्नाचा घास दिला, त्याचेच हे फळ असल्याचे रुग्णालयात अनेकांच्या तोंडातून येत होते. पिंपरी चिंचवड शहरात गोरगरिबांना आरोग्यासाठी मदत लागली की त्यांना भाऊंनी केव्हाही परत पाठविले नाही. लक्ष्मण जगताप यांचे कार्यालय हे गोरगरिबांचे आरोग्यपीठ आहे. त्यांनी जणू आरोग्यसेवेचे व्रतच स्वीकारले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच गोरगरिबांच्या आशिर्वादाने आज ‘लक्ष्मण जगताप’ यांना पुनर्जन्म मिळाला.

‘हे परमेश्वरा आमच्या सगळ्यांचे आयुष्य आमच्या भाऊंना लाभू दे! आणि त्यांना लवकरच बरं कर!

अशी प्रार्थना सर्वजण आपल्या लाडक्या नेत्याकरिता परमेश्वराकडे करत आहेत. लक्ष्मण भाऊंचा चाहता वर्ग संपूर्ण शहरात आहे, प्रत्येकाने आपल्या लाडक्या नेत्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत नेता आणि कार्यकर्त्याच्या नात्यातील निरपेक्षतेचे दर्शन घडवले.

▶️जनतेचा आशीर्वाद आणि प्रार्थना :

आपल्या सर्वांच्या प्रार्थना लक्ष्मणभाऊंना व आम्हाला शक्ती देत आहेत . सर्वांच्या शुभेच्छा, प्रार्थना व आशीर्वादाने तुमचे सर्वांचे लाडके भाऊ शहरवासीयांची सेवा करण्यासाठी पुन्हा लवकरच रुजू होतील असे त्यांच्या कुटूंबियांनी यावेळी बोलताना सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

6 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

6 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago