Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवडकर निघाले मेट्रोने बाप्पाच्या दर्शनाला ,… पिंपरी, कासारवाडी, दापोडी स्थानकांवर गणेशोत्सवा निमित्ताने तुफान गर्दी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ सप्टेंबर) : पिंपरीसह, संत तुकारामनगर (वल्लभनगर), नाशिक फाटा (भोसरी), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी या स्थानकांवर रविवारी गर्दी होती. त्यामुळे पीएमपी व खासगी वाहनांपेक्षा नागरिकांनी मेट्रोला पसंती दिल्यास अधोरेखित झाले. पिंपरीतील मेट्रो स्थानकावर तिकिटे काढण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. यावर्षी मेट्रोसेवा सुरू झाल्यामुळे सर्वांनाच उत्सुकताही आहे.

पुण्यातील गणेशोत्सवाचे केंद्रबिंदू असलेल्या मध्यवर्ती भागापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातून जाण्यासाठी मेट्रो सोयीचे असल्याने गेल्या पाच दिवसांपासून प्रवासी संख्या वाढली आहे.
पिंपरीतून (पीसीएमसी) पुण्यातील शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत मेट्रोने थेट जाता येत आहे. तेथून पुण्यातील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले पाच मानाचे गणपती आणि श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतींसह अन्य गणेश मंडळेही पायी चालत जाण्याच्या अंतरावर आहेत.

Google Ad

पुण्यातील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात. रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ असते. त्‍यांच्या सोयीसाठी मेट्रोने नियमितच्या वेळेपेक्षा रात्रीची वेळ वाढवली आहे. शुक्रवारपासून (ता. २२) मेट्रोच्या जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. बुधवारपर्यंत (ता. २७) सकाळी सहापासून रात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू असेल. गुरुवारी (ता. २८) विसर्जनाच्या दिवशी सकाळी सहापासून मेट्रो सेवा सुरू होईल. ती शुक्रवारी (ता. २९) पहाटे दोनपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतरही भाविकांना मेट्रोची सेवा उपलब्ध राहणार असल्याचे मेट्रोने कळविले आहे.

गणेशोत्सव काळात या मंडळांच्या परिसरात वाहन नेण्यास बंदी असते. तसेच कोणी वाहन आणल्यास तो वाहतूक कोंडी व गर्दीत फसतो. तास- दोन तास तो अडकून पडतो. त्यामुळे पुणे महापालिका भवनापासून भाविकांना चालतच जावे लागते. परिणामी मेट्रोचा आनंद घेणे आणि गणपती दर्शन व पुण्यातील उत्सव पाहण्याचा तिहेरी लाभ घेण्याकडे भाविकांचा कल वाढलेला दिसतो. रविवारी (ता. २४) गणेशोत्सवाचा सहावा दिवस, प्रशासनाने दर्शनासाठी वाढवलेला कालावधी आणि रविवारची सार्वजनिक सुटी यामुळे मेट्रोच्या प्रत्येक गाडीत भाविकांची गर्दी दिसून आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!