Google Ad
Uncategorized

लोकसभेला बारामतीतून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार?; यावर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ सप्टेंबर) : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आता बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे. अशातच आता येत्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

याबाबत प्रश्न विचारला असता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत कुणीही उमेदवार असेल तरी त्याचं स्वागतच आहे. आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत कुणीही निवडणूक लढवू शकतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Google Ad

नव्या संसदभवनात आता प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. तिथे काम करण्याचा अनुभव कसा होता? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. आम्हाला नवीन संसद भावनात खूप जास्त अपेक्षा होत्या. अपेक्षा अशी होती की, धोरणात्मक निर्णय होतील. आम्ही मनापासून महिला धोरणाचे स्वागत करतो. धोरणाची अंमलबाजवणी कधी होणार आहे याची तारीख आलेली नाहीये. पोस्ट डेटेड चेक दिला आहे. नाव आमचे आहे पण त्यावर तारीख नाहीये, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

मतदारसंघात गणपतीच्या दर्शनाला आली आहे. महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे,गणरायाला साकडं घालते. देश आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा हेच गणपतीला साकडं घालते आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!